AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA Alliance Meeting: दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही, थेट INDIA आघाडीची बैठक

INDIA Alliance Meeting: आज सकाळी ११ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे INDIA आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

INDIA Alliance Meeting: दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही, थेट INDIA आघाडीची बैठक
INDIA Alliance MeetingImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 9:08 AM
Share

INDIA आघाडीची आज सकाळी ११ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव मात्र बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जागी पक्षाचा दुसरा नेता उपस्थित असेल. उद्धव ठाकरे हे दिल्लीत प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे बैठकीला सहभागी होणार आहेत. शरद पवारही VC द्वारे उपस्थित राहतील. मात्र त्यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे दिल्लीत प्रत्यक्ष उपस्थित असतील.

DMK पक्षाला बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तामिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेपासून DMK ने फारकत घेतल्याने तेही अनुपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाचे नेतेही अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

आघाडीची पुढील रणनीती निश्चित होण्याची शक्यता

या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या CWC बैठकीत राहुल गांधी यांनी ‘ज्ञानेश कुमार यांना जावच लागेल’ अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत आघाडीची पुढील रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे महामंत्री के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, काँग्रेस लोकशाहीशी संबंधित मुद्द्यांवर सर्व राजकीय पक्षांसोबत मोठ्या आंदोलनाची योजना आखणार आहे. त्यांच्या मते बैठकीत नेत्यांना सूचना दिल्यानंतर पुढील कार्यक्रमाची स्पष्ट योजना तयार केली जाईल. वेणुगोपाल यांनी असेही सांगितले की, काँग्रेस आपल्या कार्यक्रम आणि INDIA गठबंधनाच्या आंदोलनादरम्यान समन्वय साधेल.

INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी दिल्लीत बॅनर बाजी

INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी दिल्लीत बॅनर बाजी पाहायला मिळाली. राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे यांचे फोटो लावत विचारले प्रश्न. ‘आये देर से इल्जाम घडी पर’ यासह वेगवेगळे आशय लिहीत अज्ञाताने हे पोस्टर्स लावले आहेत. बैठकीपूर्वी लावलेल्या या बॅनरची दिल्लीत जोरदार चर्चा सुरु आहे.

Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ