हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ! वाघाला प्रेमाने हात लावायला जाल, असं होऊन बसेल…

एक व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्या जवळ उभी आहे. पण दुसऱ्याच क्षणी तो असं काही करतो की जे पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ! वाघाला प्रेमाने हात लावायला जाल, असं होऊन बसेल...
bengal tiger attacks on man
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 04, 2022 | 5:59 PM

सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस विचार न करता वाघाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसत आहे. या नंतरनर भक्षक वाघजे काही करतो ते पाहून कोणालाही धक्का बसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिकोतील एका प्राणी संग्रहालयात ही घटना घडलीये. वाघाच्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. हा व्हिडिओ जुना आहे, पण पुन्हा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्या जवळ उभी आहे. पण दुसऱ्याच क्षणी तो असं काही करतो की जे पाहून तुम्ही थक्क व्हाल.

सुरुवातीला तो वाघाला त्याच्या दिशेने हाक मारण्याचा प्रयत्न करतो. मग तो त्याच्या मानेला हाताने मारायला सुरुवात करतो. खरं तर तो वाघाला त्रास द्यायला जातो.

वाघाचा मूड खराब होतो आणि तो पिंजऱ्याच्या आतून त्या माणसाचा हात त्याच्या जबड्यात पकडतो. वाघाचे दात लागताच माणूस वेदनेने व्याकूळ होऊन जोरजोरात ओरडू लागतो, पण वाघ त्याला सोडत नाही.

या व्हिडिओला 9 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असलं तरी ही क्लिप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, हल्ल्यानंतर तिथे खूप रक्त पसरतं.

रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय जोस डी जीझसला वाघासोबत मजा करणं कठीण गेलं. ते प्राणिसंग्रहालयाचे कर्मचारी होते. वाघाला खायला घालताना त्याला काय वाटलं ते कळेना आणि त्याने पिंजऱ्याच्या आत हात घातला.

या काळात हे भयंकर दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्डही झालं होतं. नंतर वाघाच्या हल्ल्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने जोस यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.