Video | भर रस्त्यात म्हणतोय लस घ्या…लस घ्या….माणसाच्या कारनाम्याची एकच चर्चा, व्हिडीओ व्हायरल

सध्या मात्र चर्चेत येणारा व्हिडीओ अतिशय वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस भाजीपाला  विकाणाऱ्या माणसांसारखा ओरडत आहे. विशेष म्हणजे ओरडताना तो चला लस घ्या...लस घ्या....असे मजेदार पद्धतीने म्हणत आहे.

Video | भर रस्त्यात म्हणतोय लस घ्या...लस घ्या....माणसाच्या कारनाम्याची एकच चर्चा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर एखाद्या महिलेचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी एखाद्या माणसाने केलेली करामत चर्चेचा विषय ठरते. टॅक्सी, रिक्षा चालकांचेही काही व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या मात्र चर्चेत येणारा व्हिडीओ अतिशय वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस भाजीपाला  विकाणाऱ्या माणसांसारखा ओरडत आहे. विशेष म्हणजे ओरडताना तो चला लस घ्या…लस घ्या….असे मजेदार पद्धतीने म्हणत आहे. (man shouting on road appealing people to vaccinate themselves by corona vaccine)

रस्त्यावर उभे राहत म्हणतोय लस घ्या… लस घ्या…

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस भर रस्त्यावर उभा आहे. रस्त्यावर उभं राहून तो मोठ्याने ओरडत आहे. चला..चला.. लस घ्या…लस घ्या असे तो मजेदार पद्धतीने म्हणत आहे. या माणसाच्या आजूबाजूला अनेक लोक उभे आहेत. काही चाकरमाने काम करुन आपल्या घरी जात आहेत. या सर्व लोकांना तो लस घेण्याचे आवाहन करत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

माणसाची करामत पाहून नेटकरी अवाक्

चला व्हॅक्सीन व्हॅक्सीन… कोरोनाचा पहिला डोस दुसरा डोस…. चला लवकर या. जीव वाचवणारे व्हॅक्सीन..! चला लवकर या.. चला व्हॅक्सीन व्हॅक्सीन असे हा माणूस मजेदार पद्धतीने म्हणत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून वेटकरी चांगलेच चकित झाले आहेत. बाजारात भाजीपाला विकायला बसल्यासारखं तो लस घ्या म्हणून ओरडत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या 

Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण

ब्रेडच्या तुकड्यांवर आंब्याचा रस आणि आयस्क्रिम, वडोदऱ्याच्या रेसिपीला खाद्यप्रेमी शिव्या का घालत आहेत?

ना झिंगाट, ना नागिण, लग्नातील नवऱ्याचा हा डान्स पाहुन तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

(man shouting on road appealing people to vaccinate themselves by corona vaccine)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI