Trending : सोशल मीडियावर ‘या’ आईची चर्चा; हात नसतानाही घेते मुलीची पूर्ण काळजी, पायांच्या मदतीनं करते सगळी कामं

सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचीही चांगली काळजी घेते. (Takes full care of the girl even when she has no hands, does all the work with the help of feet)

Trending : सोशल मीडियावर 'या' आईची चर्चा; हात नसतानाही घेते मुलीची पूर्ण काळजी, पायांच्या मदतीनं करते सगळी कामं

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालणारी ही बेल्जियन महिला प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचीही चांगली काळजी घेते. सारानं तिच्या या अपंगत्वाला  कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. अपंग असूनही सारा जीवनाच्या सर्व अडचणींना खंबीरपणे तोंड देते. चला तर मन आता साराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

द मिरर या वेबसाईटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 38 वर्षीय सारा हातांनी करता येणारी प्रत्येक गोष्ट तिच्या पायांनी करते. सारा ब्रसेल्सची आहे. ती म्हणते की ती तिच्या पायांनी सर्व काही करू शकते. साराच्या मते, तिला हात नसल्याबद्दल तिला जन्मापासून खंत नाही. ती म्हणाली, सुरुवातीला पायांनी काम करताना अडचणी येत होत्या, पण नंतर मला त्याची सवय झाली. सारानं शालेय शिक्षणानंतर इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांतराचा अभ्यासक्रमही केला आहे.

सारा म्हणते, आता मी घरातील सर्व कामे पायाने करते. यामध्ये केस करण्यापासून ते भाजी कापण्यापर्यंत, अगदी संगणकावर काम करण्यापर्यंत. साराला लिलिया नावाची दोन वर्षांची मुलगी आहे, तिचा जन्म 2018 मध्ये झाला. सारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप अॅक्टिव्ह आहे. या अकाऊंटवर ती तिच्या आणि मुलीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

साराचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहून असं दिसतं की ती आपल्या मुलीची खूप काळजी घेते. मुलीसाठी पायाने अन्न बनवण्यापासून ते मुलीला चमच्याने खाऊ घालण्यापर्यंत सारा सगळी कामं करते. सारा म्हणते की, अपंग होण्याव्यतिरिक्त ती एका मुलीची आई आहे. याबद्दल ती खूप आनंदी आहे. इन्स्टाग्रामवर सारानं तिच्या मुलीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघीही मजा करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

Video : माकडलिला! गाढवाच्या पाठिवर बसून माकडाचा प्रवास; लोक म्हणाले, या मैत्रीचा नादच खुळा

Video | अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच घोळ झाला, माणसासोबत नेमकं काय घडलं ?

Video | नवरी-नवरदेवाची लग्नमंडपात धम्माल, जोडी पाहून तुम्हालाही येईल हसू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI