AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच घोळ झाला, माणसासोबत नेमकं काय घडलं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्टंटबाजी करतोय. त्याने त्याच्या संपूर्ण अंगावर फटाके लावले आहेत. फटाक्यांची माळ संपूर्ण अंगावर लावून हा माणूस फटाके फोडत आहे. त्याने अंगावर लावलेले फटाके आगपेटीच्या मदतीने पेटवले आहेत.

Video | अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच घोळ झाला, माणसासोबत नेमकं काय घडलं ?
viral video
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या करामती करतात. काही लोक आश्चर्यकारक असे स्टंट करतात. तर काही लोक हास्यास्पद करामती करून चर्चेत येण्यासाठी धडपडतात. सध्या एका माणसाने अतिशय अजब काम केल्याचे समोर आले आहे. या माणसाने आपल्या अंगावर फटाके लावून स्टंटबाजी केलीय. मात्र ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. (crazy man tied firecrackers on his body terrible video went viral on social media)

माणूस अंगाला फटाके बांधले 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्टंटबाजी करतोय. त्याने त्याच्या संपूर्ण अंगावर फटाके लावले आहेत. फटाक्यांची माळ संपूर्ण अंगावर लावून हा माणूस फटाके फोडत आहे. त्याने अंगावर लावलेले फटाके आगपेटीच्या मदतीने पेटवले आहेत. यानंतर मात्र सगळं काही बदललं आहे. स्टंट करण्याच्या नादामध्ये आपण मोठी चूक केल्याचे या माणसाच्या लक्षात आले आहे.

फटाके फुटल्यानंतर माणसाची उडाली धांदल

आग लावल्यानंतर फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. माणसाने अंगावर लावलेले फटाके फुटत असल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतंय. मोठा आवाज करत हे फटाके फुटत असल्यामुळे माणसाची धांदल उडाली आहे. काय करावे हे त्याला समजत नाहीये. तसेच फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या आगीमुळे त्याचे अंग भाजत आहे. त्याच्या संपूर्ण अंगाची आग होत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी व्हिडिओतील माणूस सैरावैरा पळत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना तो थेट खाली कोसळला आहे. माणूस खाली कोसळला असला तरी फटाके वाजत आहेत. फटाक्यांमुळे सगळीकडे धूर झाल्याचे दिसतंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो सोशल मीडियाच्या वेगवेगवळ्या माध्यमांवर शेअर केला जात आहे. लोक हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी माणसाचा हा वेडेपणा असून त्याने असे करायला नको होते, असे मत मांडले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | बायकोच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, पण मध्येच घोळ झाला, पतीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

Video | डोक्यावरुन ट्रॅक्टर जाऊनही सुरक्षित, एका हेल्मेटने वाचवलं, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Video | नवरी-नवरदेवाची लग्नमंडपात धम्माल, जोडी पाहून तुम्हालाही येईल हसू

(crazy man tied firecrackers on his body terrible video went viral on social media)

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.