VIDEO VIRAL : प्रेयसी 7 वर्षे कोमात तरीही प्रियकराने पाहिली वाट, शुद्धीत आल्यावर तिच्याशीच केले लग्न

सात वर्षे कोमात असलेल्या आपल्या प्रेयसीची एका तिच्या प्रियकराने वाट पाहिली. प्रेयसी शुद्धीवर येताच हॉस्पीटलमध्ये त्याने प्रेयसीशी लग्न देखील केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO VIRAL :  प्रेयसी 7 वर्षे कोमात तरीही प्रियकराने पाहिली वाट, शुद्धीत आल्यावर तिच्याशीच केले लग्न
VIRAL VIDEO
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 30, 2026 | 3:27 PM

सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्यासोबत अनेक गोष्टी जोडल्या जातात. काही कथा इतक्या भावूक असतात की त्या पाहून लोकही लगेच विश्वास ठेवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. हॉस्पीटलच्या बेडवर तरूणी झोपलेली दिसते आणि तिच्याजवळ उभा असलेला तरूण तिच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत असा दावा केला जात होता की, तो तरूण मुलगी कोमातून बाहेर यायची तब्बल 7 वर्षे वाट पाहत होता . शुद्धीत आल्यावर तरूणाने तरूणीशी लग्नगाठ बांधली. पण रिल मागची सत्य काहीतरी वेगळच आहे.

व्हिडिओमध्ये हॉस्पीटलच्या बेडवर लाल रंगाची चुनरी घेतलेली एक तरूणी दिसते. तिच्याजवळ एक तरूण येतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो. यावेळी तरूणीच्या डोळ्यातही अश्रू पाहायला मिळतात. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. प्रियकराने प्रेयसीची तब्बल 7 वर्षे कोमातून बाहेर येण्यासाठी वाट पाहिली आणि तिच्याशीच लग्न केले यामुळे त्याचे सोशल मीडियावर फार कौतुकही होत होते. या व्हिडिओबाबत केलेल्या फॅक्ट चेकमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे तरूण – तरूणी हे दिलीप कुमार पांडे आणि अनामिका सिंह हे कंटेंट क्रिएटर्स असल्याचे सांगितले जात आहे.

Loading...

 

विशेष म्हणजे, त्यांच्या मूळ व्हिडिओसोबत सात वर्षे कोमात असण्याची कोणातीही कथा नव्हती, परंतु काही सोशल मिडिया अकाउंट्सने ही रिल वेगळ्या कथेसोबत जोडली आणि ती नव्या कथेमुळे व्हायरल झाली आहे.

लोकांनी भावूक होऊन केला व्हिडिओ शेअर

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी याला सच्च्या प्रेमाचं उदाहरण म्हटलं. काहींनी अशा प्रकारे साथ देणारा जोडीदार कुठे मिळतो अशा प्रतिक्रिया दिल्या. चांगल्या काळासोबतच कठीण काळातही साथ देणारा जोडीदार खरा असतो.असही काहींनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us