AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माकडाकडून 500 च्या नोटांचा पाऊस, अनेकांनी पैसे उचलले, पण त्यानंतर…, नक्की झालं तरी काय?

माकडाकडून लाखो रुपयांचा पाऊस..., 500 च्या नोटा सर्वांनी उचलल्या, पण त्यानंतर जे काही झालं ते जाणून तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र माकडाने केलेल्या करामतीची चर्चा...

माकडाकडून 500 च्या नोटांचा पाऊस, अनेकांनी पैसे उचलले, पण त्यानंतर..., नक्की झालं तरी काय?
फाईल फोटो
| Updated on: Oct 14, 2025 | 1:54 PM
Share

कोणी कधी जास्त खर्च केला तर आपण म्हणतो पैशांचा पाऊस पडतोय का? तर याठिकाणी तर खरंच पैशांचा पाऊस झाला आहे. ते सुद्धा 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस.. 500 च्या नोटांचा पाऊस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील सोराव तहसीलमधील आझाद सभागरसमोर एक अशी घटना घडली, ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसायला आणि विचार करायला भाग पाडलं. एका माकडाने दुचाकीच्या डिग्गीतून रोख रक्कम भरलेली बॅग चोरली आणि जवळच्या पिंपळाच्या झाडावर चढून त्यावर 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.

झाडावरून पडत असलेले पैसे अनेकांनी गोळा देखील केले. पण सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर सर्वांनी पैसे मालकाला परत केले. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. संबंधित घटना सोमवारी दुपारी घडली आहे.

सोराव तहसीलच्या गंगानगर झोनमध्ये आपल्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने आझाद सभागृहासमोर आपली बाईक पार्क केली. त्याने त्याच्या दुचाकीच्या डिग्गीमध्ये रोख रकमेची बॅग ठेवली होती, ज्यामध्ये लाखो रुपयांच्या नोटा होत्या. तरुण कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात होता. पण तरुणाचं दुर्लक्ष झालं, तेवढ्यात माकड आले आणि त्यांनी डिग्गीतून पैशांनी भरलेली बॅग काढली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, माकडांनी नोटांनी भरलेली बॅग झाडावर नेली. लोकांनी ओरडण्यास सुरुवात केली. पण माकडांनी बॅग खाली फेकली नाही. अखेर बॅगेत काही खायला मिळालं नाही. तेव्हा माकडांनी बॅग खाली फेकली. जवळपास 10 – 15 मिनिटं सर्व काही असंच सुरु होतं.

खाली असलेल्या लोकांनी गोळा केलेल्या नोटा मोजल्या आणि त्या त्या तरुणाला परत केल्या. तेव्हा त्या तरुणाने सुटकेचा नि:श्वास सोडला, पण आपली ओळख सांगण्यास नकार दिला. तरुण म्हणाला, ‘माझ्या एका चुकीमुळे लाखोंचं नुकसान झालं असतं.’, एवढंच नाही तर. परिसरात माकडांपासून सावध राहा… असे बोर्ड देखील लावण्यात आले आहेत. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर अनेक जण  फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?