Premanand Maharaj: मंदिरात ठेवताय ‘या’ वस्तू? आजच व्हा सावध, प्रेमानंद महाराजांनी सांगितले परिणाम
Premanand Maharaj on temple rules: घरातील मंदीर एक असं स्थान आहे, जिथे फक्त आणि फक्त सकारात्मक उर्जा असते... आपण घरातील मंदिरात रोज पूजा करतो. पण प्रेमानंद महाराज सांगतात, अशा काही वस्तू आहेत, ज्या घरातील मंदिरात ठेवू नये, ज्यामुळे वाईट परिणाम होतात.

Premanand Maharaj on temple rules: प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरात मंदिर असतं. जिथे रोज आपण मानतो त्या देवाची आपण पूजा करत. दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. आपण रोज घरात पूजा करतो… पण पूजा करताना आपल्याकडून अनेकदा चूका देखील होतात. त्या चूका आपल्याला कळत नाहीत. पण त्याचे परिणाम फार वाईट होतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या धार्मिक दृष्टीने योग्य नाहीत. सांगायचं झालं तर, प्रेमानंद महाराजांच्या मते, अशा गोष्टी मंदिराचं पावित्र्य नष्ट करतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो… तर जाणून घेवू प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे.
तुटलेली मूर्ती : प्रेमानंद महाराज सांगतात की मंदिरात कधीच तुटलेली मुर्ती ठेऊ नये. आपण मंदिरात ज्या देवाच्या मुर्तीची स्थापना केली असेल, त्या मुर्ती हात, मुकूट किंवा कोणता भाग तुटलेला असेल तर, मुर्ती काढून घ्या. अशी मुर्ती घरातील मंदिरात ठेवणं अशुभ मानलं जातं. तुटलेली मुर्ती तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता.
जुना किंवा फाटलेला फोटो : जर मंदिरात ठेवलेल्या देवाचा फोटो जुना किंवा फाटलेला असेल तर, फोटो मंदिरात ठेऊ नये… अशा फोटोंमुळे पूजेचा प्रभाव कमी होतो आणि मानसिक ताण वाढू शकतो. त्या जागी नवीन, स्वच्छ फोटो ठेवावे.
पूर्वजांचे फोटो ठेवू नका : मंदिरात कधीच पूर्वजांचे फोटो ठेवू नका… मंदिरात देवांचे फोटो ठेवणं शास्त्रांनुसार चुकीचं आहे. पूर्वजांच्या फोटोंची स्थापना वेगळ्या ठिकाणी करा… मंदिरात कधीच पूर्वजांचे फोटो ठेऊ नका…
वाळलेली फुले किंवा पाने : सण किंवा काही खास क्षण असेल तेव्हा आपण मंदिर पूर्ण फुलांनी सजवतो… पण वाळलेली फुले किंवा पाने मंदिरात ठेऊ नका, प्रेमानंद महाराज सांगतात, वाळलेली फुले ही नकारात्मक उर्जेचं लक्षण आहेत. दररोज पूजेनंतर ताजी फुलं अर्पण करावीत आणि जुनी फुले टाकून द्यावीत.
रिकामा दिवा किंवा धूळ : दिवा विझल्यानंतर अनेक जण दिवा तसाच ठेवतात आणि नियमीत मंदिराची सफाई देखील करत नाहीत. यामुळे देखील मंदिरातील पावित्र्य नष्ट होतं. मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे. सर्वांत आधी तर धूळ साफ केली पाहिजे…
लोखंडी किंवा प्लास्टिकची भांडी : मंदिरातील पूजेच्या तांबे, पितळ किंवा चांदी ही भांडी शुभ मानली जातात. लोखंडी किंवा प्लास्टिकची भांडी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. म्हणून, मंदिरात त्यांचा वापर टाळा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
