AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी आईच काळीज ! मुलाला वाचवण्यासाठी आई झाली सुपर मॉम, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ!

आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करते. तसे प्रेम कोणीही करू शकत नाही. आई शेवटी आई असते. आपल्या मुलांना संकटातून वाचवण्यासाठी ती देवाचे रूप घेते. एक अशी मन आहे की, देव सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून देवाने आईची निर्मिती केली आहे.

शेवटी आईच काळीज ! मुलाला वाचवण्यासाठी आई झाली सुपर मॉम, पाहा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ!
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 1:25 PM
Share

मुंबई : आई ज्याप्रमाणे (Mother) आपल्या मुलांवर प्रेम करते. तसे प्रेम कोणीही करू शकत नाही. आई शेवटी आई असते. आपल्या मुलांना संकटातून वाचवण्यासाठी ती देवाचे रूप घेते. एक अशी मन आहे की, देव सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून देवाने आईची निर्मिती केली आहे. आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते, याचे प्रत्यय दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आई आणि मुलाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओतील आईचे सर्वत्र काैतुक होताना दिसत आहे. असं म्हणतात की आईकडून मूल कोणी हिरावून घेऊ शकत नाही. समोर जरी यमराज उभा असला तरी. या व्हिडीओमध्ये एक मूल जिन्यावरून खाली पडणार होते. मात्र, आई आपला स्वत: चा जीव धोक्यात घालून आणि एक सुपरमॉमप्रमाणे आपल्या लेकराचा जीव वाचवताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि एक महिला आपल्या मुलासह लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर ती महिला कोपऱ्यात जाऊन उभी राहते. मग ते मूल पायऱ्यांकडे जाऊ लागतं. मात्र, आपले मूल कुठे जात आहे, याची काळजी महिलेला असते. तितक्यात ते लेकरू खाली वाकून बघण्याच्या नादामध्ये त्याचा तोल जातो. हेच ती आई पाहते आणि ती सुपर माॅम होऊन आपल्या लेकराला धरते.

आईने वाचवले मुलाचे प्राण

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेसोबत लिफ्टमध्ये आलेला माणूस मुलाला पडताना पाहून पायऱ्यांवरून खाली पळत आहे. यादरम्यान महिला आणि मुलाच्या किंकाळ्या ऐकून अनेक लोक तिथे येतात आणि त्या महिलेची मदत करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की या जगात देवानंतर कोणी असेल तर ती आई आहे.

संबंधित बातम्या : 

Video : चक्क ऑटो मेकॅनिकने गायले सुंदर गाणे,आनंद महिंद्रांची कृती पाहून नेटकरी फिदा!

VIDEO : रेड सिग्नलवर हेल्मेट बॉयचा बँग बँग गाण्यावर खास डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले हाच रियल डान्सर!

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...