VIDEO : रेड सिग्नलवर हेल्मेट बॉयचा बँग बँग गाण्यावर खास डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले हाच रियल डान्सर!

VIDEO : रेड सिग्नलवर हेल्मेट बॉयचा बँग बँग गाण्यावर खास डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले हाच रियल डान्सर!
डान्स व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी काय फेमस होईल याचा नियम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण हेल्मेट घाणून डान्स करताना दिसत आहे. मात्र, तुम्ही म्हणाल की, यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? मात्र, मित्रांनो हा तरूण हेल्मेट घालून चक्क रस्त्यावर सिग्नल समोर डान्स करत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 31, 2021 | 8:51 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय फेमस होईल याचा नियम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण हेल्मेट घाणून डान्स करताना दिसत आहे. मात्र, तुम्ही म्हणाल की, यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? मात्र, मित्रांनो हा तरूण हेल्मेट घालून चक्क रस्त्यावर सिग्नल समोर डान्स करत आहे. ऐकून आर्श्चय वाटले ना…

तरूणाचा सिग्नलवर खास डान्स 

प्रत्येक जण या तरूणाचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहुण याचे काैतुक करत आहे. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र तो पाहिल्यानंतर तुम्ही या हेल्मेट बॉईजच्या प्रेमात पडाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रेड सिग्नलवर ट्रॅफिक थांबल्यावर हेल्मेट घातलेला एक तरूण येतो. यानंतर तो हृतिक रोशनच्या ‘Bang Bang’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर खास डान्स करतो. दरम्यान, ट्रॅफिकमध्ये अडकलेले बाकीचे लोकही या हेल्मेट बॉईजच्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत.

हा डान्सचा खास व्हिडीओ मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर subodh londhe नावाच्या चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. 24 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हेल्मेट बॉयच्या डान्सचा हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | चित्त्याच्या समोरून माणसाने खेचली शिकार, चवताळलेल्या चित्त्याने काय केले? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें