मुंबई पोलीस भोजपुरी गाण्यावर थिरकले, व्हिडीओ व्हायरल

बिहार-यूपीच नाही तर मुंबईतही लोक भोजपुरी गाणी जोरात ऐकतात. अगदी मुंबई पोलीस अधिकारीही. होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मुंबई पोलीस अधिकारी एका भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

मुंबई पोलीस भोजपुरी गाण्यावर थिरकले, व्हिडीओ व्हायरल
Mumbai Police Dancing
| Updated on: Jun 25, 2023 | 3:09 PM

मुंबई: भोजपुरी गाण्यांना सामान्यत: अश्लील मानले जाते आणि म्हणूनच भोजपुरी चित्रपट सृष्टीला देशात फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र, भोजपुरीमध्ये तयार झालेली अनेक गाणी खरोखरच ऐकण्यासारखी आहेत, ती सर्वोत्कृष्ट आहेत. आजकाल लग्नसमारंभात भोजपुरी गाण्यांची क्रेझ खूप पाहायला मिळत आहे. गाणी वाजताच लोक कंबर हलवू लागतात. बिहार-यूपीच नाही तर मुंबईतही लोक भोजपुरी गाणी जोरात ऐकतात. अगदी मुंबई पोलीस अधिकारीही. होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मुंबई पोलीस अधिकारी एका भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बॅकग्राऊंडमध्ये भोजपुरी गायक आणि अभिनेता अरविंद अकेला म्हणजेच कल्लूचं एक गाणं वाजत आहे आणि त्यावर पोलीस काका आपली कंबर हलवत आहेत. केवळ त्यांचा डान्सच नाही तर त्यांचे हावभावही जबरदस्त आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी पोलिसांचा गणवेश परिधान केला नसून जीन्स आणि टी-शर्ट घालून कूल दिसण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही गोंधळून जाल आणि एक पोलीसही इतकं चांगलं डान्स करू शकतो, असा विचार करायला तुम्ही भाग पडाल. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

अमोल कांबळे असे मुंबई पोलिसांच्या या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने स्वत: हा डान्स व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत 7 लाख 72 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 69 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे आणि विविध मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.