AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोडी थोडी Odd आहे, पण लय लय ग्वॉड आहे..; Viral होतंय हे Naadkhula Marathi Song, एकदा पाहाच

Love is in the air : एक मराठी गाणं (Marathi Song) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालंय. हे गाणं नुकतंच रिलीज झालेलं असलं तरी ते यूझर्सना खूप आवडलंय. दोघांची क्यूट लव्ह स्टोरी या गाण्यामध्ये दाखवलीय. ती यूझर्सना खूप भावलीय.

जोडी थोडी Odd आहे, पण लय लय ग्वॉड आहे..; Viral होतंय हे Naadkhula Marathi Song, एकदा पाहाच
मी उडनछु या गाण्यातली गोड जोडी
| Updated on: Feb 18, 2022 | 7:30 AM
Share

Love is in the air : संगीतप्रेमींसाठी सोशल मीडिया हा महासागर आहे. इथे तुम्हाला तुमच्या आवडीची असंख्य गाणी पाहायला आणि ऐकायला मिळतील. जी गाणी चांगली ती हीट होतात. व्हायरल होतात. आपल्याकडे बोलायचं झालं तर हिंदीच नाही, तर वेगवेगळ्या भाषांतील गाणी लोकप्रिय होतात. मराठी गाणीही आता मोठ्या प्रमाणात लोकांना आवडायला लागली आहेत. आपण अशी अनेक गाणी ऐकतो, जी महाराष्ट्रातली म्हणजे आपल्याच राज्यातली असतात, मात्र ती आपल्याला समजत नाहीत. स्थानिक भाषेत ती असतात. मात्र त्याच्या दर्जामुळे ती लोकप्रिय झालेली असतात. आता असंच एक मराठी गाणं (Marathi Song) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालंय. हे गाणं नुकतंच रिलीज झालेलं असलं तरी ते यूझर्सना खूप आवडलंय. दोघांची क्यूट लव्ह स्टोरी या गाण्यामध्ये दाखवलीय. ती यूझर्सना खूप भावलीय.

‘मी उडनछु’

व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी दाखवलेत. खरं तर त्यांची जोडी शोभणारी नाही, असं सर्वच जण म्हणत असतात. तो तिला कसा पसंत करतो, हा प्रश्न गाण्यातून विचारण्यात आलाय. तीचं स्वप्न पायलट होण्याचं असतं. मग पुढे काय होतं, हे या गाण्यातून दाखवलंय. भाई आपण लकीए म्हणून ती आपलीए असं तो म्हणत असे. मी उडनछु असे गाण्याचे बोल आहेत. त्याच्या साथीनं तिने एव्हिएशन कंपनी सुरू केली. असं हे गोड प्रेम गाण्यातून दाखवण्यात आलंय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर प्रशांत नक्ती ऑफिशियल (Prashant Nakti Official) या चॅनेलवर हे गाणं अपलोड करण्यात आलंय. 16 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या गाण्याला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात सातत्याने वाढच होत आहे. विशाल फाळे, प्रियंका नायडू या कलाकारांसह जावेद अली, सोनाली सोनवणे यांनी हे गीत गायलंय. तर मी मी उडनछु (Mi Udanchhoo) असं कॅप्शन गाण्याला देण्यात आलंय. यूझर्सच्या कमेंट्स वाचण्यासारख्या आणि सकारात्मक आहेत. (Video courtesy – Prashant Nakti Official, Naadkhula music)

आणखी वाचा : 

Viral : सर्वकाही ठीक चालू असेल तर मी येवू ना शहरात? AjayDevgn याला टॅग करत Anand Mahindra यांनी केलं Tweet

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Video : ‘याद आ रहा है तेरा प्यार..’ वाळूशिल्प साकारत Sudarsan Pattnaik यांनी Bappi Lahiri यांना वाहिली श्रद्धांजली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.