कसं आहे तुमच्या स्वप्नातलं शौचालय? अधिकाऱ्यांकडून आदेश, “सेल्फी विथ टॉयलेट” उपक्रमाची जोरदार चर्चा

| Updated on: Nov 18, 2022 | 4:54 PM

हे प्रकरण महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलं असून, एका शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना 'सेल्फी विथ टॉयलेट' स्पर्धेत सहभागी व्हायला सांगितलंय.

कसं आहे तुमच्या स्वप्नातलं शौचालय? अधिकाऱ्यांकडून आदेश, सेल्फी विथ टॉयलेट उपक्रमाची जोरदार चर्चा
Selfie With Toilet
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

सेल्फी काढायला कोणाला आवडत नाही? सोशल मीडियाच्या जमान्यात सगळेच एकसे बढकर एक चांगले फोन वापरतात… एक छान पोझ देतात आणि नंतर एक उत्तम फोटो क्लिक करतात. पण, टॉयलेटसोबत सेल्फी काढायला सांगितल्यावरत? आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण हे खरंच घडलंय. खरंतर हे प्रकरण महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलं असून, एका शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना ‘सेल्फी विथ टॉयलेट’ स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या ‘ड्रीम टॉयलेट’चे स्केच तयार करण्याचे आदेश दिले.

सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा आयोजित करण्याबाबत शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये नाराजी आहे. अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा हेतू काय, असा सवालही त्यांनी केला आहे.

वास्तविक, 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शाळांना 19 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा करण्याचे आदेश दिले. त्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागते.

जागतिक शौचालय दिनानिमित्त ‘स्वच्छ शौचालय मोहीम’ सुरू करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे. याअंतर्गत चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छता आणि भूजल’ या विषयावर स्पर्धा आणि उपक्रम व्हायला हवेत.

‘सेल्फी विथ टॉयलेट’ शिवाय इतर उपक्रमांमध्ये ‘माय ड्रीम टॉयलेट’, ‘माय स्कूल, माय सेफ टॉयलेट’ अशा विषयांवर ड्रॉइंग कॉम्पिटिशन आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय शाळांमध्ये ‘माझी शाळा, माझे शौचालय’ आणि ‘टॉयलेट वापरण्याचे स्वच्छ मार्ग’ या विषयांवर पथनाट्य स्पर्धाही होतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनाही या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागणारे. सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले जातील. शाळांना या स्पर्धांचे आयोजन करायचे असून, त्याचा निकाल 19 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.