विसर्जनाच्या एक दिवस आधी अंबानींची नात लालबागच्या राजाच्या दरबारात; नीता अंबानीही होत्या जोडीला, VIDEO तुफान व्हायरल
विसर्जनाच्या एक दिवस आधी अंबानींची नात लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचली होती. यावेळी नीता अंबानी देखील आल्या होत्या.

Nita Ambani And Mukesh Ambani At LalbaugCha Raja: देशभरात गणेश विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गणेश विसर्जनासाचा मुंबई, पुण्यात अधिक दिसत आहे. मुंबईत अनेकांच्या नजरा लालबागच्या राजाच्या गणपतीच्या विसर्जनाकडे लागल्या आहेत. या लालबागच्या राजाच्या दरबारात अंबानी कुटुंब दरवर्षी येत असते. यंदा उद्योगपती मुकेश अंबानींची नात देखील लालबागचा राजाच्या गणपतीच्या दर्शनाला आली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी हे 24 सप्टेंबर रोजी रात्री बाप्पााच्या दर्शनाला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात देखील होती. आदिया असे त्यांच्या नातीचं नाव आहे. मुकेश अंबानी यांच्या कडेवर आदिया होती. तर त्यांच्यासोबत नीता अंबानी देखील होत्या. यावेळी नीता अंबानी यांच्या साडीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. तर गणेशभक्तांनी आजी-आजोबा आणि नातीच्या प्रेमाचं भरपूर कौतुक केलं. अनेक जण त्यांचा फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. आदिया ही ईशा अंबानी यांची मुलगी आहे. आदियाने ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केले होते.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानंतर मुकेश अंबानी आणि त्यांची नात आदियाचे बॉन्डिंगने विशेष लक्ष वेधलं. मुकेश अंबानी हे आदियाची विशेष काळजी घेताना दिसले. यावेळी नातीसोबत असताना मुकेश अंबानींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. त्यासोबत ते आनंदी दिसत होते. तर मुकेश अंबानी यांचा लूक साधा होता. त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचं शर्ट होते. गडद रंगाची पँट होती. त्यांचा साधा लूक आणि नातीसोबतचं बाँड यामुळे त्यांनी भक्तांचं लक्ष वेधून घेतलं.
नीता अंबानी देखील पारंपरिक वेशात दिसल्या. त्यांनी मरून रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती. त्यानंतर मरून रंगाचा ब्राऊज परिधान केला होता. त्या साध्या वेशात दर्शनाला आल्या होत्या. त्यांच्या केसामध्ये गजरा होता. विशेष म्हणजे आदियाची हेअरस्टाइल देखील हटके होती. अंबानी कुटुंब सर्व भक्तांमध्ये उजळून दिसत होते. दर्शनाला आलेल्या अंबानी कुटुंबाच्या व्हिडिओ आणि फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
