Optical Illusion | या चित्रात खेळण्यातली गाडी शोधा! दिसली?

ऑप्टिकल इल्युजन हा कोड्याचा प्रकार आहे. सोशल मीडियावर हे चित्र खूप व्हायरल होतात. या चित्रांमध्ये उत्तर शोधायचं म्हणजे निरीक्षण चांगलं लागतं. या प्रकारची कोडी मेंदूचा सराव करून घेतात. कधी यात लपलेली एखादी वस्तू शोधायची असते तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. आता हे चित्र बघा, यात तुम्हाला एक खेळणं शोधायचं आहे.

Optical Illusion | या चित्रात खेळण्यातली गाडी शोधा! दिसली?
optical illusion puzzle
| Updated on: Sep 30, 2023 | 12:25 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो, ही कोडी तोंडी घातली जायची आणि तोंडीच सोडवली जायची. ऑप्टिकल भ्रम म्हणजे एकप्रकारचा भ्रम असतो. या चित्रांमध्ये प्रथमदर्शनी जे दिसतं तेच खरं असतं असं नसतं त्यामुळेच याला भ्रम म्हणतात. ही चित्रे किचकट असतात. या चित्रांमध्ये जर आपल्याला काही शोधायचं असेल तर त्यासाठी निरीक्षण खूप चांगलं लागतं. ज्या लोकांना ऑप्टिकल भ्रम फारच अवघड वाटतात त्या लोकांनी याचा सराव करायला हवा. सरावाने कोडी सोडवणं अधिक सोपं जातं. यात अनेक प्रकार असतात. कधी यात लपलेली एखादी वस्तू शोधायची असते तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. आता हे चित्र बघा, यात तुम्हाला एक खेळणं शोधायचं आहे.

खेळण्यातली गाडी शोधा

हे चित्र बघा, या चित्रात एक आलिशान बाथरूम आहे. या बाथरूममध्ये तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील पडदा, खिडकी, शॉवर, ब्रश, साबण अशा अनेक गोष्टी आहेत. यात तुम्हाला एक गाडी शोधायची आहे. ही खेळण्यातली गाडी शोधणं तसं फार अवघड नाही. तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच दिसेल. आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. तुम्हाला जर खेळण्यातली गाडी शोधायची असेल तर तुम्हाला ती कशी असते हे माहित असायला हवं.

खेळण्यातली गाडी तुम्ही पाहिलीत का?

तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? या चित्रात वरून-खाली, डावीकडून-उजवीकडे नजर फिरवा. आम्ही तुम्हाला हिंट देतो. या बाथरूममध्ये खाली बॉडीवॉश ची बॉटल, हँडवॉश ठेवलेलं आहे तिथेच ही गाडी आहे. या गाडीचा काहीच भाग यात दिसून येतो. चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला याचं उत्तर दिसून येतं. लाल रंगाची छोटोशी खेळण्यातली गाडी तुम्ही पाहिलीत का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर उत्तर सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली देत आहोत.

toy car