OYO चे प्रेम घरी चालत आले, मध्यरात्री तरुणीने केला पाणउतारा, बाबू-सोना अंगलट आलं

ओयो हॉटेलचा अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ ओयो हॉटेलचा नाहीये. पण ओयो हॉटेलमध्ये जाण्याबद्दल आहे.

OYO चे प्रेम घरी चालत आले, मध्यरात्री तरुणीने केला पाणउतारा, बाबू-सोना अंगलट आलं
| Updated on: Feb 25, 2025 | 11:41 PM

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुणी मध्यरात्री तिच्या प्रियकराच्या घरी येते. ती तरुणी दार वाजवते आणि आतून आवाज येतो, “कोण आहे?” येथूनच खरा ड्रामा सुरू होतो. जेव्हा तो तरुण दार उघडतो तेव्हा त्या तरुणीला पाहून आश्चर्यचकित होतो. ती तरुणी त्याला विचारते की तुझा फोन कुठे आहे. आश्चर्यचकित झालेला तरुण म्हणतो की फोन तर इथेच आहे.

व्हिडिओमधील तरुणी पुढे म्हणते, मी तुला इतके दिवस फोन करीत आहे, तू फोन का उचलत नाहीस? यावर तो मुलगा थोडा नाराज होतो आणि म्हणतो देतो – अरे बाबू, मी बाथरूममध्ये होतो, तू इतक्या रात्री इथे कशी ? यानंतर ती तरुणी तिची ट्रॉली सुटकेस त्या तरुण्याच्या दारातून आत सरकवत म्हणते, आधी ही  आत ठेव…

येथे पाहा व्हिडीओ –

मुलीने OYO चा उल्लेख

यानंतर तो तरुण मुलगा तरुणीला विचारतो, बाबू, रात्रीच्या वेळी तू ही बॅग घेऊन इथे का आली आहेस. तरुणी म्हणते , अरे मी माझ्या घरी आले आहे, माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढले आहे. ती तरुणी पुढे म्हणते, मी आता इथे कायमची आली आहे, हे आतच ठेव. हे पाहून तो तरुण आश्चर्यचकित होऊन म्हणतो की कायमसाठी पण का?

मी गरोदर आहे…

व्हायरल व्हिडिओमध्ये त्या तरुणाला ती तरूणी आपण गरोदर आहे असे सांगते.  यानंतर ती मुलगी म्हणते, ठीक आहे बेटा, मी मग गरोदर राहिले का? यानंतर तो मुलगा म्हणतो की तू गर्भवती कशी झालीस हे मला कसे कळेल. यानंतर ती मुलगी रागाने लालबुंद होते आणि जास्त बोलू नकोस, तू मला ओयोला घेऊन गेलास त्यावेळेच सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत.