AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आता तर हद्दच झाली! नूडल्सची हेअरस्टाईल, हटके केस खाण्यासाठी दोन मुलींची घाई, व्हीडिओ एकदा बघाच…

पॉल जोन्स या तरूणाच्या डोक्यावर नूडल्स ठेवण्यात आले आहेत. हे नूडल्स म्हणजेच त्याचे केस आहेत... या नूडल्सला खाण्यासाठी दोन पुढे येतात. वरून एकजण मसाला टाकतोय. हा व्हीडिओ BMR Twins या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Video : आता तर हद्दच झाली! नूडल्सची हेअरस्टाईल, हटके केस खाण्यासाठी दोन मुलींची घाई, व्हीडिओ एकदा बघाच...
नूडल्स हेअरस्टाईल, व्हीडिओ व्हायरल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 11, 2022 | 7:13 PM
Share

मुंबई : आजूबाजूच्या गर्दीत आपण उठून दिसावं, आपला प्रभाव पडावा यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. अनेकजण त्यासाठी आपल्या लूककडे (look) विशेष लक्ष देत असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. तर बऱ्याचदा वेगवेगळ्या हेअरस्टाईलही (Hairstyle) करत असतात. पण हटके लूकच्या नादात काही विचित्र हेअरस्टाईल केल्या जातात. त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. असाच एका हटके हेअरस्टाईलचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग (Hairstyle Viral Video) आहे.नेटकऱ्यांनी कमेंट करून या व्हीडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात एक तरूणाचा हेअर स्टाईलिशने केलेला हेअरकट पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय. पॉल जोन्स या व्यक्तीच्या डोक्यावर नूडल्स ठेवण्यात आले आहेत. हे नूडल्स म्हणजेच त्याचे केस आहेत… या नूडल्सला खाण्यासाठी दोन पुढे येतात. वरून एकजण मसाला टाकतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

पॉल जोन्स या तरूणाच्या डोक्यावर नूडल्स ठेवण्यात आले आहेत. हे नूडल्स म्हणजेच त्याचे केस आहेत… या नूडल्सला खाण्यासाठी दोन पुढे येतात. वरून एकजण मसाला टाकतोय. हा व्हीडिओ BMR Twins या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर चौदा हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलंय. त्यावर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या हेअर स्टाईलची खिल्ली उडवली आहे. एकाने “चविष्ट हेअरकट!” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एक जण म्हणतो की, “हा काय हेअरकट आहे का? लोक आजकाल काहीही करायला लागलेत.”

View this post on Instagram

A post shared by BMR Twins (@bmrtwins1)

व्हायरल दुनिया

सोशल मीडियावर सध्या आणखी एक व्हीडिओ व्हायरल होतोय. ????????? या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप पाहिला जात आहे. यात या तरूणाच्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकले आहेत. डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला दोन शेंड्या ठेवल्या आहेत. या दोन्ही शेड्यां एकमेकांना जोडल्या आहेत. याहून कहर म्हणजे याला एक लहानसा चेंडू बांधलाय. त्याला झोपाळ्या त्याने झुलत ठेवलंय. या व्हीडिओला “कुणाला अशी हेअर स्टाईल हवी आहे, त्यांना टॅग करा”, असं कॅप्शन दिलंय.

View this post on Instagram

A post shared by ????????? (@earthtell)

संबंधित बातम्या

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...