क्या बात, क्या बात…क्या बात! वैमानिकाची कवितेत घोषणा, प्रवासी खळखळून हसले!

कवितेच्या रुपाने घोषणा पाठ करून त्याने प्रवाशांची मने जिंकलीच शिवाय संपूर्ण विमानात हास्याचे वातावरण तयार केले.

क्या बात, क्या बात...क्या बात! वैमानिकाची कवितेत घोषणा, प्रवासी खळखळून हसले!
pilot video goes viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 18, 2022 | 5:34 PM

हल्ली विमानांतून प्रवास करणे अतिशय सोयीचे आणि किफायतशीर झाले आहे. एक काळ असा होता की, बहुतेक लोक केवळ आकाशात उडणारी विमाने पाहण्यासाठी बेचैन व्हायचे, पण आता वेळ अशी आहे की, बहुतेकांनी विमानातून प्रवास केला असावा. जर तुम्ही कधी विमानातून प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहित असेल की विमान उड्डाणापूर्वी वैमानिकाकडून एक घोषणा केली जाते आणि लोकांना आवश्यक ती माहिती दिली जाते. साधारणत: ही घोषणा जवळपास सगळ्याच विमानांमध्ये सारखीच असते. तरी एका हटके घोषणेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पायलटने अशी मजेशीर घोषणा केली आहे की प्रवासी खूप हसलेत, पोट धरून, खळखळून हसलेत!

एक विमान दिल्लीहून श्रीनगरला जात होते. या काळात पायलटने घोषणा द्यायला सुरुवात केली. कवितेच्या रुपाने घोषणा पाठ करून त्याने प्रवाशांची मने जिंकलीच शिवाय संपूर्ण विमानात हास्याचे वातावरण तयार केले.

हिंदीतून घोषणा देत पायलटने या कवितेची सुरुवात केली, “यापुढे डेस्टिनेशनवर पोहचायला दीड तास लागतील, त्यामुळे शरीराला आराम द्या आणि धूम्रपान करू नका, अन्यथा त्याचे परिणाम शिक्षेस पात्र ठरू शकतात. उंचीबद्दल बोलायचं झालं तर 36 हजार फूट असेल, कारण आणखी वर गेलात तर कदाचित देवाचं दर्शन होऊ शकतं. आज हे विमान ताशी 800 किलोमीटर वेगाने उड्डाण करेल, भरपूर थंडी असेल, तापमान उणे 45 अंश असेल. हवामान खराब असेल तर विश्रांती घ्या” ही कविता भाषांतर केल्यावर कळून येत नाही, एकदा व्हिडीओ बघा, तुम्हीही नक्की हसाल.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Eepsita नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 9 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 11 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रकारच्या मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.