अंबानींप्रमाणे एकदम रॉयल फीलिंग! पाच लाखाच्या सोन्याच्या कपात मिळणार प्रेमाचा चहा

| Updated on: Aug 22, 2022 | 5:20 PM

अहमदनगरला पारनेर येथील 'प्रेमाचा चहा'च्या एका आऊटलेटमध्ये सोन्याच्या कपातून चहा देण्याची रॉयल पद्धत सुरु केली जाणार आहे. येथे प्रेमाचा चहा आता सोन्याच्या कपात मिळणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य ग्राहकाला सोन्याच्या कपात चहा प्यायची संधी या आऊटलेटच्या माध्यमातून मिळणार आहे. पारनेर येथील 'प्रेमाचा चहा'च्या एका आऊटलेटचे चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

अंबानींप्रमाणे एकदम रॉयल फीलिंग! पाच लाखाच्या सोन्याच्या कपात मिळणार प्रेमाचा चहा
Follow us on

मुंबई : थकवा दूर करून नवीन ऊर्जा देणाऱ्या पेय म्हणजे चहा. जवळपास सर्वच लोकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने होते. मात्र, या व्यतिरिक्त एखादी बिझनेस मीटिंग असो गेट टूगेदर, एकांत असो की जवळच्या व्यक्तीची भेट अगदी मूड फ्रेश करण्यासाठी अनेक जण चहा पितात. यामुळे चहा आवडत नाही असं म्हणणार क्वचितच कुणीतरी सापडेल. आता चहा पिताना एकदम रॉयल फिलींग येणार आहे. कारण प्रेमाचा चहा आता सोन्याच्या कपात मिळणार आहे. अहमदनगर येथील ‘प्रेमाचा चहा’च्या एका आऊटलेटमध्ये सोन्याच्या कपातून चहा दिला जाणार आहे. यामुळे सोन्याच्या कपातून चहा पिण्याची इच्छा यामुळे पूर्ण होणार आहे.

अहमदनगरला पारनेर येथील ‘प्रेमाचा चहा’च्या एका आऊटलेटमध्ये सोन्याच्या कपातून चहा देण्याची रॉयल पद्धत सुरु केली जाणार आहे. येथे प्रेमाचा चहा आता सोन्याच्या कपात मिळणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य ग्राहकाला सोन्याच्या कपात चहा प्यायची संधी या आऊटलेटच्या माध्यमातून मिळणार आहे. पारनेर येथील ‘प्रेमाचा चहा’च्या एका आऊटलेटचे चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

पाच लाखाचे दोन सोन्याचे कप

पुजारी यांच्या प्रेमाचा चहा या चहाच्या दुकानाचे आज उद्घाटन करण्यात आले. तर आजपासून या दुकानात सोन्याच्या कपात चहा देण्यात आला आहे. तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि 10 तोळ्यांचे दोन कप येथे ठेवण्यात आले आहे. असून आता सर्वसामान्यांना सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस भागवता येणार आहे.

नीता अंबानी पितात सोन्याच्या कपातून चहा

नीता अंबानी या सोन्याच्या कपातून चहा पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. तीना अंबानीच्या किचनमध्ये असलेल्या या चहाच्या कपाच्या सेटची किंमत ऐकून तुम्ही चाट पडाल. जपानमधील सर्वात पुरातन क्रॉकरी ब्रँड ‘नोरिटेक’चे हे कप आहेत. या कपांना सोन्याची (गोल्ड) बॉर्डर दिलेली आहे. 50 कपच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच या सेटमधील एका कपची किंमत तीन लाखांच्या आसपास आहे.अंबानी कुटुंबाचा चहावर दर महिन्याला तीन लाख रुपये खर्च होतात.