कोण आहे ती महिला, जिच्यापुढे स्वत: प्रेमानंद महाराज झाले नतमस्तक, व्हिडिओ व्हायरल

Premanand Maharaj Video: गुरुदेवांनी  गुरुपुत्रीच्या चरणांना नमस्कार. मुली हे दुर्गेचे रूप आहे. कदाचित हेच कारण असावे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, त्या खूप भाग्यवान आहेत, महाराज स्वतः त्यांच्या पायावर डोके ठेवत आहेत आणि आशीर्वादही देत आहेत.

कोण आहे ती महिला, जिच्यापुढे स्वत: प्रेमानंद महाराज झाले नतमस्तक, व्हिडिओ व्हायरल
Premanand Maharaj Video
| Updated on: Feb 21, 2025 | 1:29 PM

Premanand Maharaj Video: राधाराणीचे भक्त प्रेमानंद महाराज देशभर प्रसिद्ध आहे. त्यांचे देशभरात लाखो भक्त आहेत. त्यांचे प्रवचन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जाते. प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मासुद्धा प्रेमानंद महाराजांच्या दरबारात येऊन गेले आहे. अनेक सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात येत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यासह अनेक बड्या लोकांनी प्रेमानंदर महाराज यांचे दर्शन घेत त्यांना प्रणाम केला आहे. आता प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एका महिलेच्या चरणात त्यांनी आपले डोके ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे ती महिला कोण आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.

ती महिला आहे तरी कोण?

प्रेमानंद महाराजांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराज एका महिलेच्या पायावर डोके ठेवताना दिसत आहेत. त्यामुळे ती महिला आहे कोण? त्याची उत्सुक्ता प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांना लागली आहे. Instagram हॅडल @maa_kali_5454 या अकाउंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात नवविवाहित दाम्पत्य दिसत आहेत. त्या व्हिडिओत प्रेमानंद महाराज त्या महिलेस नमस्कार करताना दिसत आहे. त्यानंतर महाराज त्यांना एक हार भेट देत आहे. ती महिला प्रेमानंद महाराज यांची गुरुपुत्री असल्याचे म्हटले जात आहे.

लग्नातील आहे तो व्हिडिओ?

प्रेमानंद महाराज आपल्या गुरूंच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. या विवाहात प्रेमानंदजी महाराजांनी सर्वप्रथम आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी गुरुपुत्रीला काही भेटवस्तूही दिल्या. यावेळी प्रेमानंदजी महाराजांसह त्यांचे शिष्यही उपस्थित होते.

अनेकांनी केल्या कमेंट

व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. एका यूजरने लिहिले की, आम्ही पाहिले की गुरुदेवांनी  गुरुपुत्रीच्या चरणांना नमस्कार. मुली हे दुर्गेचे रूप आहे. कदाचित हेच कारण असावे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, त्या खूप भाग्यवान आहेत, महाराज स्वतः त्यांच्या पायावर डोके ठेवत आहेत आणि आशीर्वादही देत आहेत.