सापांना घरात बोलवणारी वेल, आसपास एकतरी साप असतोच, तुमच्याकडेही आहे का?
भारतामध्ये हजारो प्रताजीचे साप आढळून येतात. प्रत्येकाची वैशिष्ठ्य वेगवेगळी आहेत. प्रत्येकाच्या सवयी देखील वेगवेगळ्या आहेत. काही साप हे प्रचंड आक्रमक असतात, तर काही साप हे स्वभावाने खूप शांत असतात. मात्र या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट असते, ती म्हणजे काही विशिष्ट वनस्पती किंवा गोष्टींमुळे साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतात.

भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात. प्रत्येकाची आढळस्थानं देखील वेगवेगळी आहेत. जसं की उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा नेपाळला लागून असेल्या भारताच्या सिमावर्ती प्रदेशात किंग कोब्रा ही सापाची अत्यंत विषारी जात आढळून येते. हे साप अतिशय विषारी आणि प्रचंड मोठे असतात, तसेच ते प्रचंड आक्रमक देखील असतात. त्यांना पहाताच भीती वाटते. महाराष्ट्रात सापाची ही प्रजात आढळून येत नाही. महाराष्ट्रात नाग आढळून येतात. नाग हे दिसायला किंग कोबरा सारखेच असतात. परंतु किंग कोबराच्या तुलनेत ते आकाराने खूप छोटे असतात. मात्र नाग हे देखील अतिशय विषारी आणि आक्रमक असतात. राज्यात सापांच्या ज्या बिग फोर प्रजाती आढळून येतात. त्यात नागाचा समावेश होतो. महाराष्ट्रात चार विषारी सापांच्या प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग यांचा समावेश होतो, यालाच बिग फोर असं देखील म्हटलं जातं.
प्रत्येक सापांचा त्यांच्या प्रजातीनुसार स्वभाव देखील वेगवेगळा असतो. जसं की घोणस, नाग या जातीचे साप हे अतिशय विषारी असतात, त्याचसोबत ते प्रचंड चपळ आणि आक्रमक देखील असतात, ते केव्हाही हल्ला करू शकतात. या उलट काही लाजाळू सापांच्या जाती देखील आढळून येतात. हे साप माणसांवर कधीही हल्ला करत नाहीत. ते माणसांपासून दूर निघून जातात.
अशा काही विशिष्ट वनस्पीत असतात, ज्या त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे जाईचा वेल. या फुलांभोवती मोठ्या प्रमाणात मधमाशा आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी विविध किटक देखील तिथे येतात. या किटकांना खाण्यासाठी बेडूक येतात आणि या झाडाभोवती बेडूक असल्यामुळे आयती शिकार मिळाल्याने अनेकदा साप देखील अशा वेलाभोवती असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना नेहमी काळजी घ्यावी. या वेलाभोवती स्वच्छता ठेवावी. जास्त गवत वाढू देऊ नये. गवत वाढल्यामुळे या ठिकाणी उंदिर आणि घुशी यांची संख्या देखील वाढते, त्यामुळे सुद्धा साप देखील या ठिकाणी येतात.
