AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखच्या KKR मध्ये अमेरिकन दिग्गज कंपनीची एंट्री! जय मेहता विकणार 22.5 टक्के हिस्सा, डील किती कोटींची?

Shah Rukh Khan KKR Set for New Investor: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता कोलकाता नाईट रायडर्समधील आपला हिस्सा विकणार आहेत. 22.5 टक्के हिस्सा ते एका अमेरिकन कंपनीला विकणार आहेत.

शाहरुखच्या KKR मध्ये अमेरिकन दिग्गज कंपनीची एंट्री! जय मेहता विकणार 22.5 टक्के हिस्सा, डील किती कोटींची?
Kolkata Knight Riders Jay Mehta to Sell Half His Stake
| Updated on: Nov 18, 2026 | 7:25 PM
Share

तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होणार आहे. फ्रँचायझीचे सह-मालक आणि अभिनेत्री जुही चावला यांचे पती जय मेहता संघातील आपला निम्मा हिस्सा विकण्यास तयार आहेत. जय मेहता आपल्या 45 टक्के हिश्श्यापैकी 22.5 टक्के हिस्सा एरेस मॅनेजमेंट या आघाडीच्या अमेरिकन गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीला विकणार आहेत.

ही तीच कंपनी आहे जी प्रसिद्ध इंग्लिश प्रीमियर लीग क्लब चेल्सी एफसी आणि एनएफएल संघ मियामी डॉल्फिन्सची देखील मालक आहे. क्रिकबझच्या एका अहवालानुसार, जय मेहता आणि एरेस मॅनेजमेंट यांच्यातील हा करार सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स किमतीचा असण्याची शक्यता आहे. या करारानुसार कोलकाता नाइट रायडर्सचे एकूण मूल्यांकन 1.78 अब्ज डॉलर्स इतके आहे. ही किंमत अलीकडील इतर आयपीएल फ्रँचायझींच्या मूल्यांकनाशी सुसंगत आहे. ज्यात राजस्थान रॉयल्सचा 15,660 कोटी रुपये आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 16,660 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानकडे केकेआरमध्ये 55 टक्के बहुसंख्य हिस्सेदारी आहे, जी तो कायम ठेवणार आहे. 2007 मध्ये जेव्हा बीसीसीआयने पहिल्यांदा आठ आयपीएल संघांचा लिलाव केला होता, तेव्हा शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता यांनी कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत ही फ्रँचायझी खरेदी केली होती. जय मेहता आणि एरेस मॅनेजमेंट यांच्यात हा संपूर्णपणे रोख रकमेचा व्यवहार असेल, जो आता अंतिम टप्प्यात आहे.

या व्यवहाराला बीसीसीआयची औपचारिक मंजुरी आवश्यक असेल. जी नवीन मालकाची सखोल तपासणी करेल. नियमांनुसार, बीसीसीआयला व्यवहाराच्या मूल्याच्या 5 टक्के रक्कम मिळेल, ज्यामुळे मंडळाला अंदाजे 20 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 2022 मध्ये सीव्हीसी कॅपिटलने गुजरात टायटन्सला विकत घेतल्यापासून आयपीएलमध्ये अमेरिकन कंपन्यांचा रस झपाट्याने वाढला आहे.

आरसीबीमध्ये ब्लॅकस्टोन आणि बोल्ट व्हेंचर्ससारख्या अमेरिकन कंपन्यांसोबतच आदित्य बिर्ला ग्रुप आणि टाइम्स ग्रुपचेही गुंतवणूकदार आहेत. एरेस मॅनेजमेंटसाठी क्रिकेट नवीन नाही; केन इंटरनॅशनलसोबत ‘द हंड्रेड’च्या नॉटिंगहॅम-स्थित फ्रँचायझी, ट्रेंट रॉकेट्सची ती सह-मालक आहे. केकेआरने 2012, 2014 आणि 2024 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले, तर 2021 मध्ये ते उपविजेते ठरले.

Follow Us
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण
बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं...
Shambhuraj Desai : बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने फाडला असेल तर...; शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात