AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा ब्लॉकबस्टर देणारा दिग्दर्शक, पण झाला अहंकारी, जाणूनबुजून बनवले 26 फ्लॉप चित्रपट

सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक. पण नंतर बनला भस्मासुर. झाला इतका अहंकारी की त्याने जाणूनबुजून बनवले 26 फ्लॉप चित्रपट. कोण आहे तो दिग्दर्शक?

सर्वात मोठा ब्लॉकबस्टर देणारा दिग्दर्शक, पण झाला अहंकारी, जाणूनबुजून बनवले 26 फ्लॉप चित्रपट
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 05, 2026 | 1:36 PM
Share

Ram Gopal Varma : बॉलिवूडमध्ये असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांच्या चित्रपटांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण त्यांनी कधी मनात अहंकार येऊ दिला नाही. पण इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक आहे, ज्याने सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. पण त्याच्या मनात इतका अहंकार आला की त्याने जाणूनबुजून तब्बल 26 फ्लॉप चित्रपट बनवले.

धाडसी सिनेमासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अलीकडेच आपल्या करिअरबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आणि वाढलेल्या अहंकारामुळे त्यांच्या करिअरला मोठा फटका बसला. आपल्या अनेक चित्रपटांच्या अपयशासाठी त्यांनी स्वतःलाच जबाबदार धरले आहे.

‘सत्या’नंतर दिशाभूल झाली

‘सत्या’ या सुपरहिट चित्रपटानंतर आपण योग्य दिशेपासून भरकटलो असे वर्मा यांनी सांगितले. या चित्रपटात त्यांनी अंडरवर्ल्डची खरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सामान्य लोकांना गुन्हेगारी जगताबद्दल फक्त गोळीबार, खून किंवा पोलिस एन्काऊंटर यांच्याच बातम्या ऐकायला मिळतात. मात्र ‘सत्या’मध्ये त्यांनी गँगस्टर्सचे वैयक्तिक आयुष्य, त्यांचे नातेसंबंध आणि भावना दाखवल्या. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

मात्र या चित्रपटानंतर काहीतरी मोठे आणि वेगळे करायला हवे होते. ते न केल्यामागे आपला अहंकार आणि निष्काळजीपणा कारणीभूत होता असे त्यांनी स्पष्ट केले. राम गोपाल वर्मा यांनी प्रामाणिकपणे सांगितले की त्यांच्या अनेक हिट चित्रपटांचा यशस्वी होणे हा कोणत्याही ठोस प्लॅनचा भाग नव्हता. जर त्यांना हिट चित्रपट बनवण्याचा ठराविक फॉर्म्युला माहिती असता तर त्यांनी कधीही फ्लॉप चित्रपट बनवले नसते. मी फक्त चित्रपट बनवतो. तो हिट होईल की फ्लॉप हे माझ्या हातात नसते असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ही माझी सर्वात मोठी चूक’

आपल्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपटाबद्दल विचारले असता वर्मा यांनी ‘आग’ या चित्रपटाचे नाव घेतले. हा चित्रपट बनवण्यासाठी सर्वाधिक वेळ आणि पैसा खर्च झाला पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी डिपार्टमेंट या चित्रपटाचाही उल्लेख केला.

महत्त्वाचे म्हणजे, आपल्या संपूर्ण करिअरमध्ये राम गोपाल वर्मा यांनी एकूण 36 चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यापैकी तब्बल 26 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. तरीही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख कायम आहे.

Follow Us
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले... दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट.

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?.

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका.

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ.

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला