AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: गदा सोडून हातात बंदूक, रावणाचा भांगडा करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरुन हसले!

सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये, 'रावण' हा अतिशय उत्तम भांगडा नृत्य करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ काही 'रामलीला' मंचावरचा दिसतो आहे.

Video: गदा सोडून हातात बंदूक, रावणाचा भांगडा करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरुन हसले!
रामलीला सुरु असतानाच रावणाचा भांगडा
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 12, 2021 | 1:15 PM
Share

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कधी असे दुर्मिळ प्रसंग इंटरनेटवर व्हायरल होतात, की ते वाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात की जे पाहून लोक पोट धरुन हसतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही तुमच्या हसण्यावर ताबा ठेऊ शकणार नाही. (Ravan bhangra on punjabi song video goes viral on social media)

सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये, ‘रावण’ हा अतिशय उत्तम भांगडा नृत्य करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ काही ‘रामलीला’ मंचावरचा दिसतो आहे. या व्हिडिओमध्ये, पाहिले जाऊ शकते की स्टेजवर ‘रावण’ च्या गेटअपमध्ये, एक व्यक्ती हातात बंदूक धरून आहे. त्याचवेळी एक पंजाबी गाणे वाजतं. आणि हे गाणं वाजल्यानंतर रावणाच्या भूमिकेतील व्यक्तीला स्वत:वर ताबा ठेवता येत नाही आणि हा ‘रावण’ गाण्यावर मस्तीमध्ये भांगडा करु लागतो. रावणच नाचतो आहे म्हटल्यावर, स्टेजवरची इतरही मंडळी डान्स करु लागतात.

प्रेक्षक गॅलरीत बसलेले लोक रावणाच्या नृत्याचा आनंद घेत आहेत. लोकांना रावणाची ही शैली खूप आवडत आहे. म्हणूनच लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया वेगाने नोंदवायला सुरुवात केली. एका युजरने सांगितले की, रावणाची ही शैली खरोखर लोकांचं मन जिंकत आहे.

व्हिडीओ पाहा:

हा मजेदार व्हिडिओ IFS रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘पंजाबमध्ये एक’ रावण ‘रामलीला दरम्यान भांगडा एन्जॉय करत आहे. बातमी लिहिल्यापर्यंत हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच सोशल मीडियावर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रावणाची स्तुती करताना लोक थकत नाहीत. हेच कारण आहे की हा व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे.

मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. पण इंटरनेट विश्वात पोस्ट केलेला हा व्हिडिओ लोकांना खूप हसवत आहे. व्हिडिओवर केलेल्या कमेंट्स पाहून तुम्हाला कल्पना येईल की लोक रावणाच्या दबंग शैलीला किती पसंत करत आहेत.

हेही पाहा:

Video: आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण सुरु असतानाच कुत्र्याने केली घाण, नेटकरी म्हणाले, कुत्रे हुशार असतात!

Video: तुमची संकटं मोठी वाटत असतील, तर नरेशला भेटा, संकटांशी लढायला शिकवणारा व्हिडीओ

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!