गब्बरने शेवटच्या श्वासापर्यंत सापाशी लढा दिला, मालकासाठी त्याने आपला जीव दिला!

गब्बर नावाच्या कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी रसेल व्हायपर या जगातील सर्वात विषारी सापाचा सामना केला

गब्बरने शेवटच्या श्वासापर्यंत सापाशी लढा दिला, मालकासाठी त्याने आपला जीव दिला!
pitbull
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 17, 2022 | 11:09 AM

जेव्हा जेव्हा आपण कुत्र्यांबद्दल बोलतो, तेव्हा तेव्हा कुत्रा किती निष्ठावान असतो हे आपण आधी ऐकतो. खरं आहे कुत्रे आपल्या मालकाशी खूप एकनिष्ठ असतात आणि जेव्हा जेव्हा मालक संकटात सापडतो तेव्हा सगळ्यात आधी त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी कुत्रा तिथे उभा राहतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात पाहायला मिळाला, जेव्हा एका कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

गब्बर नावाच्या कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी रसेल व्हायपर या जगातील सर्वात विषारी सापाचा सामना केला आणि तो मरेपर्यंत त्या सापाला चावत राहिला.

सापाने गब्बरवर अनेक वेळा हल्लाही केला होता, त्यामुळे काही वेळातच गब्बरचाही मृत्यू झाला. गब्बरने आपल्या मालकाचा जीव वाचवता वाचवता आपले प्राण गमावले.

मीडिया रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशातील प्रतापपुरा येथील रहिवासी जिल्हा पंचायत सदस्य अमित राय यांच्याकडे अनेक पाळीव कुत्रे आहेत, परंतु गब्बर त्यापैकी सर्वात खास आणि जवळचा होता.

पाच वर्षांपूर्वी मालकाने त्याला आपल्या घरी आणले. तो आपला पाळीव कुत्रा गब्बरसह आपल्या फार्म हाऊसमध्ये फिरत असताना रसेलचा व्हायपर साप त्याच्या पायाखाली आला.

सापाने मालकावर हल्ला केला, मात्र त्यानंतर गब्बरने सापाला पकडले त्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. कुत्रा आणि साप यांच्यात जोरदार भांडण झालं. सापाला ठार मारल्यानंतर गब्बर जमिनीवर कोसळला. या झटापटीत दोघांचाही मृत्यू झाला.

गब्बरच्या मालकाला गब्बर जखमी झाल्या झाल्या त्याला उपचारासाठी घेऊन जायलाही पुरेसा वेळ मिळाला नाही. तोपर्यंत गब्बर जखमी होऊन मरण पावला होता.

त्याच्या मृत्यूनंतर कुत्र्याचा मालक खूप भावूक झाला आणि गब्बरला पाहून तो रडला. गब्बर गेल्या पाच वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. अमितच्या मांडीवर गब्बरचा फोटो आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.