Sapna Choudhary ची पुन्हा एकदा जादू! रंगीबेरंगी सूट, शेतात डान्स

सपनाचे लाखो चाहते आहेत, जे तिची गाणी आणि डान्स पाहून थकत नाहीत आणि सपना देखील तिच्या चाहत्यांना नाराज करत नाही आणि ती दररोज त्यांच्यासाठी काहीना काही टाकत असते.

Sapna Choudhary ची पुन्हा एकदा जादू! रंगीबेरंगी सूट, शेतात डान्स
Sapna choudhary dance video
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 04, 2023 | 4:55 PM

हरियाणवी क्वीन या नावाने ओळखली जाणारी सपना चौधरी तिच्या बेधडक स्टाईलमध्ये डान्स करण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक कार्यक्रमात सपना चौधरीची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. अनेकदा सपना चौधरीचा डान्स पाहून लोकही बेकाबू होतात. लोकही तिच्या डान्स व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण तिचा डान्स वेगळाच असतो! शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सपनाचे लाखो चाहते आहेत, जे तिची गाणी आणि डान्स पाहून थकत नाहीत आणि सपना देखील तिच्या चाहत्यांना नाराज करत नाही आणि ती दररोज त्यांच्यासाठी काहीना काही टाकत असते. अलीकडच्या काळात तिने शेअर केलेला एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सपना चौधरी शेतात आपला परफॉर्मन्स देताना दिसतीये. ती तिच्या डान्स मूव्ह्स आणि तिच्या परफॉर्मन्समुळे लोकांना वेड लावत आहे. सपना चौधरी शेतात ‘मेरी जुत्ती शहर लाहोर से मांगवा दो राजाजी’ या हरियाणवी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सपना चौधरीने आपल्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी ही जागा निवडलीये. हा व्हिडीओ सगळ्यांच्या पसंतीस उतरलाय. या परफॉर्मन्स दरम्यान सपनाने कलरफुल सूट घातलाय.

काही सेकंदाची ही रील त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 1.18 लाखांहून अधिक लोकांनी रील लाइक केले असून कमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुक केले जात आहे.

विशेष म्हणजे सपना चौधरी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. दररोज तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले जातात. व्हिडिओतील शानदार डान्ससह आपल्या मोहक स्टाईलने सपना प्रेक्षकांना वेड लावायला चुकत नाही.