Viral | बोंबला, सीमा हैदरबाबत विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलं असं की वाचून मास्तरला आली चक्कर

Seema Haider Answer in Paper : सीमा हैदर नाव कोणाला माहिती नाही असं होणार नाही. सीमान हैदरची प्रेमकथा जगभरात गाजली. आता वेगळ्याच कारणाने ती परत एकदा चर्चेत आली आहे. शाळकरी मुलाने भारत-सीमा प्रश्नाचं उत्तर लिहिताना थेट सीमा हैदरसोबतच भारत-पाक ची सीमा जोडत अर्थ लिहिला आहे.

Viral | बोंबला, सीमा हैदरबाबत विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलं असं की वाचून मास्तरला आली चक्कर
| Updated on: Dec 25, 2023 | 9:48 PM

मुंबई : पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. सीमा हैदरनं भारतात येत तिचा प्रियकर सचिन मीनाशी लग्न केलं. त्यानंतर सगळीकडे सीमीचीच चर्चा सुरू झाली. पण सीमा भारतात आल्यानंतर ती पाकिस्तानी जासूस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिची चौकशी केली जात आहे, आता सीमा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

राजस्थानमधील एका विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये पेपर लिहिताना सीमा हैदरचा उल्लेख केला आहे. सध्या या विद्यार्थ्याचा पेपर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर झालं असं की, राजस्थानमधील धौलपुर जिल्ह्यातील एका शाळेत आयोजित केलेल्या बारावीच्या परीक्षेत विज्ञानच्या प्रश्नपत्रिकामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमेबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न असा होता की भारत आणि पाकिस्तान मधील सीमा नेमकी काय आहे आणि ती किती लांब आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर देताना एका विद्यार्थ्याने चक्क सीमा हैदरचा उल्लेख केला आहे.

 

विद्यार्थ्यांना सीमा हैदरचा उल्लेख करत प्रश्नपत्रिकेत लिहिलं आहे की, भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये असलेल्या सीमेला सीमा हैदर म्हटलं जातं. तसंच तिची उंची पाच फूट सहा इंच आहे. विद्यार्थ्याने दिलेले हे उत्तर ऐकून शिक्षक देखील चकित झाले आहेत. तसंच विद्यार्थ्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलं व्हायरल होतं आहे.

पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यानं हे अतरंगी उत्तर लिहिलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अजय कुमार. या विद्यार्थ्याच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. काही लोकांनी तर या विद्यार्थ्याचं कौतुक देखील केलं आहे. तर त्याच्या या प्रश्नपत्रिकेवरती लोकं मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.