Video | उंदराच्या मावशीलाही पिझ्झाचा मोह आवरेना, पिझ्झासाठी चक्क तिनं हात जोडले!

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेन्ट्सचा पाऊस पाडलाय. आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. तर दोन हजारपेक्षा जास्त जणांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

Video | उंदराच्या मावशीलाही पिझ्झाचा मोह आवरेना, पिझ्झासाठी चक्क तिनं हात जोडले!
Image Source - Instagram
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 8:50 PM

मांजरी हा एक असा पाळीव प्राणी आहे, जो लगेचच माणसांमध्ये एडजस्ट (Adjust) होऊन जातो. माणसाळलेल्या मांजरी इतक्या प्रेमळ आणि माया करणाऱ्या असतात की विचारु नका! तुम्ही त्यांचे कितीही लाड करा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना कुरवाळा, हे सगलं कितीही केलं, तरिही ते कमीच ठरेल. मांजरी या अत्यंत प्रेमळ आणि क्यूट असतात. या मांजरीचे खूप सारे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ तुम्ही पाहिलेले असतील. असाच आणखी एक व्हिडीओ एका इन्टाग्राम युजरनं शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मांजरीनं पिझ्झा पाहून अक्षरशः हात जोडलेत.

पिझ्झासाठी उतावळी!

एकानं आपल्या घरात पाळलेल्या मांजरीला पिझ्जाचं गाजर दाखवलं. मांजरही पिझ्झा खाण्यासाठी उतावळी झाली होती. पिझ्झा पाहून मांजरीच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. आपल्या क्यूट इशाऱ्यांना मांजरीनं पिझ्झा देण्याची विनवणी सुरु केली. पिझ्झा पाहून तोंडाला पाणी सुटलेली मांजर अक्षरशः हात जोडून पिझ्झाची मागणी आपल्या मालकाकडे करु लागली.

मांजरीनं हात जोडले

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेन्ट्सचा पाऊस पाडलाय. आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. तर दोन हजारपेक्षा जास्त जणांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. पिझ्झा पाहून माणूसच काय तर मांजरीलाही मोह आवरता न आल्याचं एकानं म्हटलंय. तर पिझ्झा दाखवून प्राण्यांना असा त्रास देणं योग्य नसल्यानं दुसऱ्यानं म्हटलंय. cats_of_instagram नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तब्बल सतरा लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!

अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक

Fish rain | इकडे मार्गशीर्ष संपला, तिकडे माशांचा पाऊस पडला? कसा? समजून घ्या!