चला कोडं सोडवूया, लाकडात लपलेला पक्षी शोधून दाखवा!

अवघ्या 9 सेकंदात या लाकडांमध्ये लपलेला पक्षी आपल्याला शोधावा लागणार आहे. जो कोणी हा ऑप्टिकल भ्रम सोडवेल त्याला प्रतिभावंत म्हटले जाईल.

चला कोडं सोडवूया, लाकडात लपलेला पक्षी शोधून दाखवा!
Solve the puzzle find the bird
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 14, 2023 | 11:38 AM

ऑप्टिकल इल्युजन जर लवकरात लवकर सोडवायचं असं तुम्ही ठरवलंत तर तुमची चिकाटी तुमचे मनोबल वाढवते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होते. आपण कधी विचार केला आहे का की आपण पाहत असलेल्या चित्रात असे काहीतरी दडलेले आहे जे कोणालाही सहजासहजी दिसत नाही? अशा कोड्यासारख्या प्रतिमांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. आपल्याला प्रथम आपले निरीक्षण कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. चला तर मग तुम्हाला एक असे चित्र दाखवतो ज्यात एक पक्षी आहे पण तो सहजासहजी कोणालाही दिसत नाही.

नियमित सरावाने ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज सोडवण्यात तुम्ही तज्ज्ञ होऊ शकता. आपण आपल्या निरीक्षण कौशल्यांची पातळी तपासू इच्छित आहात? हे ऑप्टिकल भ्रम आव्हान वापरुन पहा. वर शेअर केलेल्या फोटोमध्ये लाकडे एकत्र ठेवलेले दिसतायत.

अवघ्या 9 सेकंदात या लाकडांमध्ये लपलेला पक्षी आपल्याला शोधावा लागणार आहे. जो कोणी हा ऑप्टिकल भ्रम सोडवेल त्याला प्रतिभावंत म्हटले जाईल. दिलेल्या मुदतीत त्याचा शोध घेण्याची अट आहे. वेळेची अट असल्याने हा खेळ अधिकच मजेदार बनतो.

आपल्यासमोर पक्षी शोधण्याचे आव्हान आहे आणि तो शोधण्यासाठी आपल्याकडे 9 सेकंद आहेत. तुम्ही आतापर्यंत हा पक्षी पाहिला आहे का? चित्राकडे बारकाईने लक्ष द्या आणि चित्रातील पक्षी दिसतो का ते पहा. जर आपण आतापर्यंत पक्षी पाहण्यात अपयशी ठरला असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ज्यांनी कोडे सोडवले आहे, त्यांचे निरीक्षण कौशल्य उत्कृष्ट आहे. चित्राच्या मध्यभागी उजव्या बाजूला हा पक्षी दिसतो. ते ओळखणे आणखी सोपे व्हावे म्हणून खाली एक चित्र देतोय त्यात उत्तर आहे.

here is the answer