‘थार न हो पाई पार, पानी में डूब गई जार-जार, कब समझेंगे ये गंवार, हा VIDEO पाहून तुम्ही काय म्हणालं?

हा खतरनाक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) @sachya2002 नावाच्या आयडीने शेअर केलाय. युजरने कॅप्शनमध्ये फिरकी सुद्धा घेतलीय. 'THAR खरेदी करण्याची एकमवे अट...डोकं गहाण ठेवावं लागेल'.

‘थार न हो पाई पार, पानी में डूब गई जार-जार, कब समझेंगे ये गंवार, हा VIDEO पाहून तुम्ही काय म्हणालं?
suv overturns
Image Credit source: Twitter/@sachya2002
| Updated on: Aug 30, 2025 | 3:01 PM

निर्सग जेव्हा रौद्ररुप दाखवतो, तेव्हा त्या समोर कोणी टिकू शकत नाही. देशातील अनेक राज्यात निसर्गाच विक्राळ रुप पहायला मिळतय. अनेक गावं बुडाली आहेत, पूल तुटले आहेत. रस्ते वाहून गेले आहेत. या नैसर्गिक संकटात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक प्रकोपामुळे जेव्हा विद्धवंस सुरु असतो, तेव्हा त्यात माणूस अडकण्याची चूक करत नाही. पण काही लोकं नको ते, जीव संकटात घालण्याच साहस दाखवतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सगळी चूक SUV चालकाची आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात जीप चालवण्याचं धाडस अंगाशी आलं. जीपसह तो वाहून गेला.

ही घटना मोहालीच्या नयागांवमधील माजरी येथील आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण गावात पाणी भरलं होतं. रस्ते सुद्धा बुडून गेले होते. गावाला समुद्राच रुप प्राप्त झालेलं. पाणी खूप फोर्सने वाहत असल्याच व्हिडिएओमध्ये दिसतय. पाणी इतक्या जोरात वाहत असताना एक व्यक्ती आपली SUV घेऊन निघतो. आरामात आपण दुसऱ्या टोकाला पोहोचू असं त्याला वाटतं. पण त्याचा अंदाज चुकीचा असतो. पाण्याच्या वेगवान प्रवाहात तो गाडीसह वाहून गेला. आसपासचे लोक पाहण्यातव्यतिरिक्त काहीच करु शकत नव्हते. कारण पाणी वाहण्याचं ठिकाण आणि फोर्सच तितका होता.

किती लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला?

हा खतरनाक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) @sachya2002 नावाच्या आयडीने शेअर केलाय. युजरने कॅप्शनमध्ये फिरकी सुद्धा घेतलीय. ‘THAR खरेदी करण्याची एकमवे अट…डोकं गहाण ठेवावं लागेल’. अवघ्या 23 सेकंदाचा हा व्हिडिओ 1.3 मिलियन म्हणजे 13 लाख वेळा पाहण्यात आला आहे. 10 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केलाय.


‘आजकाल गुडघ्यामध्ये लोकांचा मेंदू आहे’

हा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलय, ‘खूपच चांगलं झालं…थेट नरकात गेलात’, दुसऱ्या युजरने लिहिलय की, ‘आजकाल गुडघ्यामध्ये लोकांचा मेंदू आहे’ एका युजरने कवितेच्या अंदाजात कमेंट केलय. ‘थार न हो पाई पार. पानी में डूब गई जार-जार, कब समझेंगे ये गंवार, जो हो जाते हैं इसपर सवार और भूल जाते हैं ये बार-बार कि ये है तो सिर्फ एक कार’.