AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धामुळे सामान्यांची झोप उडाली, पाण्याच्या बॉटलची किंमत थेट दुप्पट; सरकारी कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका!

इराण आणि इस्त्रायल युद्धाचा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. येथे बंद बॉटलमधील पाणी, कोळसा महागला आहे. एक लिटर पाण्याची बॉटल आता 10 रुपयांच्या वाढीव किमतीने मिळत आहे. त्यामुळे सामान्यांना फटका बसत आहे.

युद्धामुळे सामान्यांची झोप उडाली, पाण्याच्या बॉटलची किंमत थेट दुप्पट; सरकारी कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका!
iran israel warImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2026 | 9:00 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ भारताला चांगलीच बसत आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस आहे. परंतु अजूनही हे युद्ध थांबण्याची शक्यता नाही. या युद्धामुळे भारतात उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. एलपीजी, पीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा भाव 60 रुपयांनी महागला आहे. आता खाद्यतेलांची किंमतही वाढली आहे. असे असतानाच आता सामान्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. बिसलेरी बॉटल, कोळसादेखील चांगलाच महागणार असून नागरिकांना आणखी फटका बसणार आहे.

बाटली बंद पाणी किती रुपयांनी महागले?

आखातातील युद्धाचा पुण्यातील माढा तालुक्यात मोठा फटका बसताना दिसतोय. येते बाटली बंद पाण्याची किंमत चांगलीच वाढली आहे. येथे बाटली बंद पाण्याच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.प्लॅस्टिकची पाण्याची बाटली तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. सोबतच कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात सर्व सामांन्याना हा फटका बसत आहे. येथे 12 बाटल्याचा बाॅक्स जवळपास 20 ते 25 रुपयांनी महागला आहे. अगोदर 75 रुपयांना मिळणारा बाॅक्स आज 95 रुपये ते 100 रुपयापर्यंत पोहचला असून युद्ध सुरूच राहिल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पाण्याची बाटली अगोदर 10 रुपयांना विकली जात होती. ती बॉटल आता बाजारात 15 ते 20 रुपयांच्या पुढे विकली जात आहे.

कोळशाचा भावही वाढतोय?

दुसरीकडे व्यावसायिक गॅसमुळे आता कोळशाच्या मागणीत वाढ झाली झाली आहे. हॉटेल व्यवसायिकांकडून अधिक प्रमाणात कोळसा खरेदी केला जात आहे. कोळशाची मागणी वाढल्यामुळे कोळशाच्या दरात देखील वाढ झाली आहे. अगोदर तीस रुपये किलोने विकला जाणारा कोळसा आता 35 रुपये किलोने विकला जातोय. व्यावसायिक गॅस टंचाईमुळे कोळशाला अनेक हॉटेल व्यवसायिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच कोळशाचा भाव वाढत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनाही फटका

गॅसच्या टंचाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही फटका बसायला लागला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाजवळ असलेल्या उपहारगृहात गॅस टंचाईमुळे मोजकेच पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत. गॅस मिळत नसल्याने उपहारगृहचालकांनी कोळशाच्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत मोजके पदार्थ देण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेत तसेच चित्र दिसून आले आहे.

Follow Us
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटी
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय... लेकाला विधान परिषदेत जागा
जशास तसे! मविआ'त मोठी घडामोड, थेट निर्णय...  लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका! नागेश आष्टीकरांविरोधात ग्रामस्थांचा संताप, गद्दारी केल्यास परिणाम भोगावे लागतील
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ
घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर अंधारेंचा संताप
Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून...
Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून... दिल्लीत मोठं घडणार?
ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश
Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण
शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून दानवेंचा घणाघात
Ambadas Danve । शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून अंबादास दानवेंचा घणाघात
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा मंत्री?
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा