AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बोट दुर्घटना; 271 प्रवाशी असलेल्या फेरीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू

मोठी बोट दुर्घटना घडली आहे. एका फेरी बोटीला अचानक आग लागली, जेव्हा या बोटीला आग लागली त्यावेळी या बोटीमधून तब्बल 271 जण प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे, घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे.

मोठी बोट दुर्घटना; 271 प्रवाशी असलेल्या फेरीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू
मोठी बोट दुर्घटना Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 7:13 PM
Share

इंडोनेशियातील एका बेटाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. एका फेरी बोटीला अचानक आग लागली या घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, 41 जण बोपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या मदुरा नावाच्या बेटाजवळ ही घटना घडली आहे. जेव्हा या बोटीला आग लागली तेव्हा या बोटीमधून 271 जण प्रवास करत होते, त्यामध्ये प्रवासी आणि काही क्रू मेंबर्स यांचा समावेश होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं असून, घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या घटनेत 5 जाणांचा मृत्यू झाला असून, 42 जण बेपत्ता आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान जे बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू असून, आतापर्यत 225 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.

आगीचं कारण अस्पष्ट

ज्या बोटीला आग लागली ती बोट जावा प्रांताच्या सुराबाया येथून दक्षिण सुलावेसी प्रांतामधील मकासर शहराकडे निघाली होती. मात्र वाटेतच ही दुर्घटना घडली आहे. इंडोनेशियाच्या मदुरा नावाच्या बेटाजवळ या बोटीला अचानक आग लागली, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली बोटीने पेट कशामुळे घेतला त्याच्या कारणांचा शोध सुरू असल्याची माहिती इंडोनेशियाच्या सरकारकडून देण्यात आली आहे. नॅशनल सर्च अँन्ड रेस्क्यू एजेन्सीकडून प्राप्त माहितीनुसार सगळ्यात आधी बोटीला आग लागल्याचं या बोटीच्या कॅप्टनला कळालं, आग लागल्याची बातमी प्रवाशांमध्ये पसरताच मोठा गोंधळ उडाला. या घटनेत आतापर्यंत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 41 जण बेपत्ता आहेत, बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून, 225 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे.

11 जुलै रोजी व्हिएतनाममध्ये फु क्वोक बेटाच्याजवळ एक स्पीडबोट उलटून मोठा अपघात झाला होता, या अपघातामध्ये 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या बोटीमध्ये 32 प्रवासी होते, दरम्यान या बोट अपघातानंतर आता हा आणखी एक मोठा बोट अपघात झाला आहे, ज्यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अगा लागल्यामुळे ही घटना घडली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं