AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर व्हायचं तेच झालं, चीनची थेट युद्धभूमीत उतरण्याची घोषणा, आता इराणमध्ये जाऊन…जगाच्या भूवया उंचावल्या!

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. या युद्धामुळे जगाला उर्जासंकटाचा फटका बसत आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असताना आता दुसरीकडे चीनने मोठी भूमिका घेतली आहे. चीनच्या या भूमिकेची जगभरात चर्चा होत आहे.

अखेर व्हायचं तेच झालं, चीनची थेट युद्धभूमीत उतरण्याची घोषणा, आता इराणमध्ये जाऊन...जगाच्या भूवया उंचावल्या!
china assistance to iranImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2026 | 6:27 PM
Share

China On Iran Israel War : अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. काहीही झालं तरी आम्ही युद्दातून माघार घेणार नाही, इस्रायलला धडा शिकवू अशी भूमिका इराणने घेतली आहे. दुसरीकडे आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, इसा रोखठोक इशारा इस्रायलने दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेने होर्मुझच्या खाडीत इतर देशांनी आपल्या युद्धनौका पाठवाव्यात असे आवाहन करून जगभरातील देशांना युद्धात अप्रत्यक्षपणे उडी घेण्याचे आवाहन केले होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता चीनने मोठी भूमिका घेतली आहे. चीनच्या या भूमिकेची जगभरात चर्चा चालू आहे.

इराणचा कमांडर, सुरक्षा प्रमुख ठार

इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस पेटत चालले आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस आहे. तरीदेखील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात कोणतीही शस्त्रसंधी घडून येण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या नाहीत. उलट इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश एकमेकांवर मोठ हल्ले करताना दिसत आहेत. इस्रायलने नुकतेच इराणचे कमांडर गुलामरेजा सुलेमानी यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. यासह इस्रायलचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनाही ठार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच युद्ध सध्यातरी थांबण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

चीनने नेमकी काय भूमिका घेतली?

मिळालेल्या माहितीनुसार चीनने इराण आणि लेबनॉन यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. इराण, लेबनॉन तसेच अन्य मध्य पूर्व देशांना आम्ही मानवीय दृष्टीकोन ठेवून त्यांना मदत करू असे चीनने म्हटले आहे. चीनतर्फे युद्धामध्ये ज्या लोकांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत केली जाणार आहे. याआधीही इराणमध्ये प्रभावित लोकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा चीनने केलेली आहे.

चीनने घेतलेली आहे इराणला पुरक भूमिका

दरम्यान, हे युद्ध सुरू झाल्यानंतर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली होती. चीनने इराणवरील हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे, असे म्हणत युद्धाला विरोध केला होता. चीनने आतापर्यंत तरी इराणला पुरक असणारी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त