AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात… युद्ध संपणार?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असतानाच आता इस्त्रायलने इराणबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.

अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात... युद्ध संपणार?
Gholamreza SoleimaniImage Credit source: एक्स
| Updated on: Mar 17, 2026 | 5:27 PM
Share

America Iran- Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 17 वा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्याल आम्ही सोडणार नाही, असा इशारा इस्रायलकडून केला जात आहे. या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात अनेक इराणी सैन्य, अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता इस्रायलने हादरवून टाकणारा दावा केला आहे. इस्रायलने इराणच्या एका महत्त्वाच्या कमांडरला मारले आहे, असा दावा केला जातोय. इराणने मात्र अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

कमांडरला केले ठार, इराणला धक्का

इस्रायलने आम्ही इराणचे कमांडर गुलामरेजा सुलेमानी यांना ठार केले आहे, असा दावा केला आहे. सुलेमानी यांच्याकडे इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या (आयआरजीएस) बाजिस यूनिटचे सुलेमानी हे प्रमुख होते, असे सांगितले जात आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूबाबतचे हे वृत्त खरे असेल इराणला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने सुलेमानी यांच्यासोबतच इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनाही ठार करण्यात आल्याचे सांगितले आहे. लारिजानी हे इराणच्या अनेक अधिकाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे आणि शक्तीशाली अधिकारी होते.

इराणच्या संरक्षण विभागाने काय सांगितले?

या कथित कारवाईबाबत इराणच्या डिफेन्स फोर्सने माहिती दिली आहे. आयडीएफच्या हल्ल्यात लारिजानी आणि बसीज कमांडरला मारण्यात आले आहे. जो कोणी इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखेल त्याला आम्ही लक्ष्य करू, असे आयडीएफने म्हटले आहे. इस्रायलच्या या दाव्यावर इराणने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

निष्पाप इराणी नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, पश्चिम आशियात अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाला 28 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. या युद्धात इराणी निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. युद्धाचा परिणाम म्हणून संपूर्ण जगावर उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे हे युद्ध नेमके कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल