AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने फक्त भारताच्या जहाजांनाच का दिली होमूर्जमधून जाण्याची परवानगी? नेमकी काय झाली डील? पहिल्यांदाच मोठी बातमी समोर

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. मात्र भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताची दोन जहाजन होर्मूजमधून सोडण्यात आली आहेत.

इराणने फक्त भारताच्या जहाजांनाच का दिली होमूर्जमधून जाण्याची परवानगी? नेमकी काय झाली डील? पहिल्यांदाच मोठी बातमी समोर
s jaishankar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 4:56 PM
Share

इराणचं अमेरिका आणि इस्त्रायलसोबत भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होमूर्ज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद झाल्यानं जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. कारण जगाला जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारतामध्ये जेवढं कच्च तेल येतं, त्यातील सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. मात्र सध्या इराणने हा मार्ग युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद केला आहे, त्यामुळे अनेक देशातील जहाजं या मार्गावर अडकून पडले आहेत. संपूर्ण जग इंधन टंचाईच्या समस्येसोबत लढत असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाजं या मार्गाने सोडली आहेत. यावर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, आमची इराणसोबत थेट चर्चा सुरू होती, त्याचा परिणाम म्हणून भारतीय जहाजांचा होर्मुज स्ट्रेटमधून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांना होमूर्ज स्ट्रेट ओपन करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. फायनांशियल टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जयशंकर यांनी म्हटलं की, भारत आणि इराणमध्ये थेट चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर शनिवारी भारतीय झेंडा असलेली दोन जहाजांनी होर्मूजच्या सामुद्रधुनीचा मार्ग सुरक्षितरित्या पार केला. माझी सातत्याने इराणसोबत चर्चा सुरू आहे, आणि त्याचे काही परिणाम देखील पहायला मिळत आहेत.

पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की, सध्या आमची इराणसोबत चर्चा सुरू आहे. भारताची जहाज होमूर्जच्या सामुद्रधुनीमधून जाऊ द्यावीत यासाठी इराणसोबत भारताचा कोणताही करार झालेला नाही, आणि भारताची जहाज या मार्गाने जाऊ देण्याच्या बदल्यात भारताकडून इराणला काहीही मिळालेलं नाहीये. सध्या इराणसोबत चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम सुद्धा समोर येत आहे. ही प्रक्रिया सुरूच आहे. जर यामधून मार्ग निघाला तर आम्ही इराणसोबतची चर्चा सुरूच ठेवू. भारताची कायम हीच भूमिका आहे की, या समस्येवर चर्चेद्वारे तोडगा काढला जावा, जर दुसर्‍या देशांना देखील या प्रकरणात चर्चेचा मार्ग सापडला तर हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो असंही यावेळी जयशंकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर