AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या मंदिरात पुरुषांना साडी आणि दागिने घातल्यावरच मिळतो प्रवेश, कारण आहे खास

भारतातील एकमेव असे मंदिर जिथे पुरुषांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाताना नेसावी लागते साडी. करावा लागतो मेकअप आणि सोळा शृंगार. कुठे आहे ही परंपरा? जाणून घ्या सविस्तर

भारतातील या मंदिरात पुरुषांना साडी आणि दागिने घातल्यावरच मिळतो प्रवेश, कारण आहे खास
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 02, 2026 | 4:35 PM
Share

भारतातील विविध मंदिरांशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्चर्यकारक परंपरा जोडलेल्या आहेत. त्यापैकी केरळमधील कोट्टनकुलंगरा देवी मंदिराची परंपरा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुषांना नेहमीच्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळत नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना महिलांप्रमाणे साडी नेसावी लागते आणि सोळा शृंगार करूनच देवीचे दर्शन घ्यावे लागते.

कोट्टनकुलंगरा देवी मंदिरात दरवर्षी ‘चामयाविलक्कु’ हा प्रसिद्ध धार्मिक उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पुरुष भाविक येथे येतात. मंदिराच्या परंपरेनुसार कोणत्याही पुरुषाला पँट-शर्ट, कुर्ता किंवा इतर नेहमीच्या पोशाखात मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

दर्शनासाठी प्रत्येक पुरुषाने महिलांप्रमाणे साडी परिधान करणे आवश्यक असते. त्याचबरोबर चेहऱ्यावर मेकअप, हातात बांगड्या, केसांमध्ये गजरा आणि इतर पारंपरिक दागिने परिधान करूनच देवीसमोर उपस्थित राहावे लागते.

मंदिराबाहेर उभारले जातात मेकअप स्टॉल

उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मंदिराबाहेर विशेष व्यवस्था केली जाते. अनेक तात्पुरते ब्युटी पार्लर आणि मेकअप स्टॉल उभारले जातात. येथे व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट पुरुषांना साडी नेसण्यापासून ते संपूर्ण पारंपरिक शृंगार करण्यापर्यंत मदत करतात. भाविकही कोणताही संकोच न बाळगता श्रद्धेने ही परंपरा पाळतात आणि देवीच्या दर्शनासाठी सज्ज होतात.

या अनोख्या प्रथेच्या मागे एक जुनी लोककथा सांगितली जाते. स्थानिक मान्यतेनुसार, अनेक वर्षांपूर्वी काही गुराखी मुले खेळताना मुलींचे कपडे परिधान करून देवीची पूजा करत होती. त्यांच्या निरागस भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले. तेव्हापासून पुरुषांनी महिलांच्या वेशात देवीची पूजा करण्याची ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. स्थानिक श्रद्धेनुसार देवीला हा भक्तिभाव अत्यंत प्रिय आहे.

मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा

या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांचा विश्वास आहे की, महिलांच्या वेशात आणि संपूर्ण श्रद्धेने देवीचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात. चांगली नोकरी, आरोग्य, कुटुंबातील सुख-शांती किंवा इतर कोणतीही इच्छा देवी पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेमुळे दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाऱ्या पुरुषांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जाते.

(डिस्क्लेमर : ही बातमी केरळमधील कोट्टनकुलंगरा देवी मंदिराशी संबंधित स्थानिक धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि ‘चामयाविलक्कु’ उत्सवाविषयी उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. वाचकांनी या माहितीकडे धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरेच्या संदर्भातच पाहावे.)

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार