AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता Flipkart वरुनही जेवण ऑर्डर करता येणार, ग्राहकांना होणार मोठा फायदा, Zomato आणि Swiggy ला वाढली स्पर्धा.

ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता फूड डिलिव्हरी व्यवसायात उतारण्याची तयारी करीत आहे. कंपनीने १५ ऑगस्टपासून बंगळुरु शहरापासून या फूड डिलिव्हरी सेवेची सुरुवात होऊ शकते असे म्हटले जात आहे. यासाठी कंपनीने शहरातील अनेक रेस्टॉरंटशी करार करण्यास सुरुवात केली आहे.

आता Flipkart वरुनही जेवण ऑर्डर करता येणार, ग्राहकांना होणार मोठा फायदा, Zomato आणि Swiggy ला वाढली स्पर्धा.
Now order food from Flipkart too
| Updated on: Aug 03, 2026 | 1:02 PM
Share

१५ ऑगस्टच्या आसपास Flipkart बंगुळुरु येथून तिची फूड डिलिव्हरी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंपनी रेस्टॉरंट्सकडून १० टक्के कमिशन घेण्याची योजना आखत आहे. सध्या प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत ही फी कमी असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवात ONDC नेटवर्कद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरात सुरु होण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्टचे या क्षेत्रात अशा वेळी आगमन होत आहे ज्यावेळी या भारतीय फूड डिलीवरी क्षेत्रात आधीच Zomato आणि Swiggy चा दबदबा आहे. अलिकडेच Rapido ने देखील तिचा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Ownlyद्वारे बाजारात एण्ट्री केली आहे.

रेस्टॉरेंट्सना कमी कमीशनची ऑफर

फ्लिपकार्ट रेस्टॉरेंट्सना आकर्षित करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे, कंपनीने त्यांच्याकडून १० टक्के कमीशन आकारण्याची योजना आखली आहे. सध्या Zomato आणि Swiggy सर्वसाधारणपणे १६ ते ३० टक्क्यांपर्यंत कमिशन घेतात. अशात आता फ्लिपकार्ट कमी कमीशन मॉडेल छोटे आणि मोठ्या दोन्ही रेस्टॉरंट्ससाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

फ्लिपकार्ट हा व्यवसाय पारंपारिक मॉडेलच्या ऐवजी ऑपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC)चा वापर करणार आहे. ONDC सरकारची योजना असून ज्याचा हेतून डिजिटल कॉमर्सला जास्त खुला आणि प्रतिस्पर्धी बनवणे आहे. यामुळे फ्लिपकार्टला सुरुवातीपासून संपूर्ण नेटवर्क तयार करण्याची गरज लागणार नाही आणि ती वेगाने तिची सेवा सुरु करु शकणार आहे.

आधी फ्लिपकार्ट फूड डिलिव्हरी सेवा केवळ बंगळुरु येथून सुरु करणार आहे. कंपनी आपल्या निवडक ग्राहकांसाठी या सेवेची चाचणी करणार आहे. ग्राहकांची प्रतिक्रीया आणि सेवेतील सुधारणेनंतर अन्य शहरात देखील ही सेवा फ्लिपकार्ट सुरु करणार आहे. ग्राहक फ्लिपकार्टची फूड डिलिव्हरी सेवेचा वापर मुख्य फ्लिपकार्ट ऐप सह एका स्वतंत्र फूड डिलिव्हरी ऐपद्वारे देखील करु शकणार आहे.

ग्राहकांन काय होणार फायदा?

जर फ्लिपकार्टने कमी कमीशन मॉडलला यशस्वीपणे लागू केले तर रेस्टॉरंटना खर्च कमी येऊ शकतो. त्याच्या फायदा ग्राहकांना चांगली ऑफर, कमी डिलिव्हरी चार्ज आणि जास्त सुटच्या रुपात होऊ शकतो. दुसरीकडे झोमॅटो, स्विगीलाही यामुळे बाजारात टिकण्यासाठी त्यांच्या कमीशन धोरण आणि बिझनस मॉडेलला बदलायला लागू शकते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं