AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : भाजपाचं सर्वात मोठं धक्कातंत्र, आता फडणवीसांना केंद्रात थेट…बड्या नेत्याच्या थेट विधानाने एकच खळबळ!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेत लवकरच काहीतरी मोठं होऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे.

Devendra Fadnavis : भाजपाचं सर्वात मोठं धक्कातंत्र, आता फडणवीसांना केंद्रात थेट...बड्या नेत्याच्या थेट विधानाने एकच खळबळ!
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 4:38 PM
Share

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रात बऱ्याच घडामोडी वाढल्या आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देशाचे नवे शिक्षणंत्री असतील, असा दावा केला जात होता. राज्यात तशी चर्चा केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेत लवकरच काहीतरी मोठं होऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार?

या क्षणी देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल तर ते नाव हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील ते माहिती आहे. माझ्या माहितीनुसार याबाबत मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. तुम्ही केंद्रात या. तुम्ही मनुष्यबळ विकासमंत्री व्हावे. या खात्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, असे मोदी यांनी फडणवीस यांना सांगितलं असल्याचा दावा राऊत यांनी केला.

माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना एक आश्वासन दिलं आहे. तुम्ही केंद्रात या, राज्यात तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल, असं मोदींनी फडणवीसांना सांगितल्याचाही दावा राऊतांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहणार

राज्यातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांच्या या दाव्यावर टीका केली. राऊत यांना हा तिसरा डोळा कुठून मिळाला काय माहिती. त्यांना कोणी तिसरा डोळा दिलेला असेल तर ते मला माहिती नाही. राऊत जे बोलत आहेत, तसं काहीही होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मजबूत असे मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस हेच बघू शकतात. म्हणूनच राऊत यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?