AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाचं श्रेय घेऊ नका; निला विखेंच्या आरोपांवर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

Sujay Vikhe Patil Statement: निलेश लंके-रोहित पवारांच्या टीकेला सुजय विखेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. सभ्यता म्हणून काही मुद्दे बोललो नाही, असं म्हणत त्यांनी सुनावलं आहे.

विजयाचं श्रेय घेऊ नका; निला विखेंच्या आरोपांवर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Sep 26, 2026 | 9:48 PM
Share

खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, निलेश लंके यांचे दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूरचे डायलॉग आता जुने झाले आहे. निलेश लंके यांना स्वीडन कुठे आहे हे माहीत आहे का ?, असं म्हणत सुजय विखे पाटलांनी सवाल केला आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील तीन वर्षांत निलेश लंके यांच्यावर वैयक्तिक पातळीवर कधीही बोललो नाही. विकासकामांऐवजी पारिवारिक वादात पडून राजकारण करणे जिल्ह्यासाठी धोकादायक असते. महिलांच्या कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दाही उपस्थित करता आला असता मात्र सभ्यता म्हणून बोललो नाही. समाजासाठी काही काम केले नाही, त्यामुळे हायलाईट होण्यासाठी मुद्दा शोधला जातोय, असं म्हणत सुजय विखेंनी निलेश लंकेवर जहरी टीका केली आहे.

रोहित पवारांवर बोलताना विखे म्हणाले की, रोहित पवार हे सुसंस्कृत परिवारातील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनीही सुसंस्कृतपणा जपावा. आमच्या कौटुंबिक विषयांवर बोलत असाल तर तुमच्या कौटुंबिक कलहावरही चर्चा होऊ शकते. विखे-पवार कुटुंबांनी कौटुंबिक विषय कधीही माध्यमांसमोर आणले नाहीत. आम्ही पक्षांतर केले असेल, तरी जनतेने पाच वेळा महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये निवडून दिले आहे.

स्वीडनच्या खासदार निला विखेंवर बोलताना ते म्हणाले की, कौटुंबिक गोष्टींचे राजकारण थांबले पाहिजे. श्रेयवादाचा विषय नाही. निला विखे स्वकष्टाने स्वीडनमध्ये काम करत आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमच्या कौटुंबिक प्रश्नावर चर्चा का? निला विखे पाटील या स्विडनच्या खासदार झाल्या त्याबद्दल पत्रकारांनी विचारले. एक परिवार म्हणून राहिलोय त्यामुळे भाषणात मी मार्मिक पणे अभिनंदन केले. मला श्रेय घ्यायचं नाही. त्यांनाही नाही. आम्ही तिकडे आणि त्या इकडे प्रचाराला आल्या नाहीत, असं त्यांना सांगितलं.

सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, ते स्वकष्टाने तिकडे काम करत आहेत. आम्ही इकडे. श्रेयवादाचा विषय नाही. आमचा संपर्क जरी नसला तरी ज्येष्ठ लोक परिवारातील सदस्य म्हणून अभिनंदन करतात. कौटंबिक गोष्टीचे राजकारण होत आहे ते थांबावं. आम्ही काही फ्लेक्स लावले नाहीत. पत्रकार परिषद घेतली नाही, असं म्हणत त्यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?