VIDEO | कुत्र्याचं आणि वासराचं एकमेकावर जिवापाड प्रेम, दोघांनी एकमेकांना केलं किस, दोघांची मैत्री पाहून तुम्ही सुध्दा…

VIDEO | एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कुत्रा आणि वासरु या दोघांमध्ये किती प्रेम आहे हे स्पष्ट झालं आहे. व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट आहे की, दोन्ही प्राणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत आहेत.

VIDEO | कुत्र्याचं आणि वासराचं एकमेकावर जिवापाड प्रेम, दोघांनी एकमेकांना केलं किस, दोघांची मैत्री पाहून तुम्ही सुध्दा...
two animal love
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 05, 2023 | 9:58 AM

मुंबई : तुम्हाला प्राणी आवडतात का ? त्याचबरोबर तुम्हाला ते पाहायला आवडतात का ? आमच्याकडे एक असा व्हिडीओ आहे जो तुमचं मनं नक्की जिंकेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कुत्रा (Dog) आणि वासरु (Calf) यांच्यात दोस्ती असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन्ही प्राण्याचं (animal viral video) एकमेकांवर किती जिवापाड प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे.

Redditor u/JettMe_Red यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, व्हिडीओमध्ये कुत्रा वासराला किस करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी कुत्रा थांबतो, त्यावेळी वासरु कुत्र्याला किस करतंय. कुत्र्याचा कान सुध्दा वासराने चाटले आहेत. दोन्ही प्राणी एकमेकांवरती प्रेम करीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपुर्वी शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 22 हजार लोकांना लाईक केला आहे. त्याचबरोबर लाईक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर केल्यापासून त्या व्हिडीओ खाली विविध प्रकारच्या कमेंट करण्यात आल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहीलं आहे की, “अरे, ते चांगले मित्र आहेत!” दुसर्‍याने नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मला काही फरक दिसत नाही. दोन मुले, दोन प्रजाती, दोन हृदये, दोघेही प्रेम, दया आणि करुणेला पात्र आहेत.” तिसर्‍या व्यक्तीने कमेंट केली आहे की, “डोगोला दयाळूपणासाठी ए मिळते, वासराला प्रयत्नासाठी ए मिळते.”

Doggo is friends with the calf..
by u/JettMe_Red in AnimalsBeingBros

प्राण्यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यापैकी लोकांच्या पसंतीला पडलेले अनेक व्हिडीओ आहेत. चांगले व्हिडीओ लोकांनी वारंवार पाहिले आहेत. त्याचबरोबर इतरांना सुध्दा पाठवले आहेत.