12 बायका, 102 मुले, 578 नातवंडे, आपल्या मुलांची नावे विसरतो, मग…

Family Heritage : घरच्यांनी आणि नातेवाईकांनी सल्ला दिल्यामुळे १२ लग्न केली. सध्या ६८ वय असलेल्या व्यक्तीला १०२ मुलं आहेत. सध्या त्या व्यक्तीला मोठा पश्चाताप होत आहे. कारण असलेल्या सगळ्या व्यक्तींना संभाळणं शक्य नाही. त्यांच्या दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या आहेत.

12 बायका, 102 मुले, 578 नातवंडे, आपल्या मुलांची नावे विसरतो, मग...
Family Heritage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2023 | 10:47 AM

नवी दिल्ली : युगांडा येथील लुसाकामधील एका ६८ वय असलेल्या व्यक्तीची जगात सगळीकडं (Trending News) चर्चा सुरु आहे. त्या व्यक्तीने १२ लग्न केली आहेत. त्यांना १०२ मुलं देखील आहेत. त्याचबरोबर 578 नातवंडं आहेत. तुम्ही सध्या जे काही वाचत आहात ते खरं आहे. मुसा हासाह्या कसारा (Family Heritage) म्हणून ओळखल असलेल्या व्यक्तीने कबूल केले की, त्यांनी कधीही गर्भनिरोधक वापरले नाही. इतक्या मुलांचा बाप (viral news) झाल्यानंतर त्या व्यक्तीने आता आपला निर्णय बदलला आहे. तो गर्भनिरोधक वापरण्यास नकार देतोय, परंतु त्याऐवजी त्याच्या पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या देत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

पहिलं लग्न 17 व्या वर्षी, नंतर…

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुसाने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मुसा या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे त्याला त्याच्या मुलांची नावं लक्षात ठेवणं अवघड होतं आहे. काही मुलांना तो विसरलो सुध्दा आहे, त्यांची नावं सुध्दा त्याच्या लक्षात नाहीत. एएफपीचा एक रिपोर्टनुसार, मुसा ही व्यक्ती केवळ १७ वर्षाची असताना 1972 मध्ये त्याचं पहिलं लग्न झालं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी अधिक लग्न करुन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता.

१२ लग्न, १०२ मुलं, ५७८ नातवंडे

घरच्यांनी आणि नातेवाईकांनी सांगितल्यामुळे मुसा या व्यक्तीने १२ महिलांशी लग्न केलं आहे. त्याचबरोबर तो 102 मुलांचा बाप सुध्दा झाला आहे. सध्या त्या व्यक्तीला पश्चाताप होत आहे. मुलाचं जेवणं, शिक्षण, कपडे हा सगळा खर्च त्याला परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या आहेत. त्याने सांगितलं आहे की, माझी अजून मुलं जन्माला घालण्याची इच्छा नाही. कारण मी इतकी सारी मुलं जन्माला घातली आहेत, की त्यांना संभाळणं माझ्यासाठी सर्वात कठीण काम आहे. सध्या माझी तब्येत खराब होत आहे, इतक्या सगळ्या कुटुंबासाठी केवळ माझ्याकडे दोन एकर जमीन आहे. मी सध्याच्या परिस्थिती बेरोजगार आहे. मुसा ही व्यक्ती त्यांच्या गावात चर्चेतील व्यक्ती आहे. युगांडामध्ये अनेक महिलांनी लग्न करण्याची पुरुषांना परवानगी आहे. त्याचबरोबर ही एक पारंपारिक प्रथा सुध्दा आहे.