VIDEO | अस्वलापासून जीव वाचवण्यासाठी माणूस झाडावर चढू लागला, अस्वलही चढले आणि माणसाचे पाय ओढू लागले, मग…
ज्यावेळी एका व्यक्तीला झाडावर चढताना अस्वल पाहत आहे. त्यावेळी ते अस्वल त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते आणि त्याचा पाठलाग करताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

मुंबई : तुम्हाला जंगलात (Forest Area) पायी फिरायला आवडतं का ? समजा तुम्हाला जंगलात पायी फिरायला आवडतं असेल, तर हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा. व्हिडीओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती जंगलात पायी चालत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी तिथं असलेल्या अस्वल आणि त्या व्यक्तीची समोरसमोर भेट होते. त्यावेळी ती घाबरलेली व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी काय करीत आहे हे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर त्यावर अनेकांनी कमेंट (bear viral video) सुध्दा केल्या आहेत.
त्या व्हिडीओमध्ये एक अस्वल झाडावर आपला जीव वाचवण्यासाठी चढलेल्या व्यक्तीचा पाठलाग करीत आहे. ज्यावेळी जंगलात अस्वल त्या व्यक्तीला पाहते, त्यावेळी ते पाठलाग करु लागते. त्यावेळी ती व्यक्ती झाडावर चढत आहे, अस्वल जाऊन त्या व्यक्तीचा पाय पकडते. त्यादरम्यान ती व्यक्ती अत्यंत धाडसाने झाडावर चढते, परंतु एका स्टेजला गेल्यानंतर अस्वल झाडावर चढण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ एखाद्या व्यक्तीने तयार केला आहे असं वाटतंय, परंतु हा खरा व्हिडीओ आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ऑडली टेरिफायिंग ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 1 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. लोकांनी या व्हिडीओला पाहून हजारो कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले, अस्वलालाही झाडावर चढणे माहित असते. दुसऱ्याने लिहिले – तो पाण्यात धावू शकतो आणि पोहू शकतो.
सोशल मीडियावर प्राण्यांचे असे व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ लोकांच्या पसंतीला पडतात. त्याचबरोबर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा लोकं कमेंट करतात आणि शेअर करतात.