काश्मीर मधील ही मुलगी सध्या प्रचंड चर्चेत! 10 वर्षीय अक्सा सोशल मीडियावर घालते धुमाकूळ

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अक्साने जेव्हा 'चिल्लई कल्लन' बद्दलचा पहिला व्हिडिओ बनवला तेव्हा ती अवघ्या 6 वर्षांची होती.

काश्मीर मधील ही मुलगी सध्या प्रचंड चर्चेत! 10 वर्षीय अक्सा सोशल मीडियावर घालते धुमाकूळ
What Aqsa Says
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 04, 2022 | 6:33 PM

काश्मीरमधील एक 10 वर्षीय मुलगी आपल्या आकर्षक यूट्यूब व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शाह रसूल मेमोरियल वेलकीन सोपोरची विद्यार्थिनी अक्सा मसरत काश्मीरची सर्वात तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय होतीये. अक्साने आपल्या व्हिडिओंनी हजारो लोकांना प्रभावित केलंय.

लहान मुलगी नियमितपणे तिच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हॉट अक्सा सेझ’ (What Aqsa Says) नावाचे व्हिडिओ पोस्ट करते. अक्साचे यूट्यूबवर 2,800 पेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत, तर फेसबुकवर त्याचे 58,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

या व्हिडीओमध्ये अक्सा आपल्या काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल तर बोलतेच, शिवाय आपल्या समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ती आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलचाही उत्तम वापर करते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अक्साने जेव्हा ‘चिल्लई कल्लन’ बद्दलचा पहिला व्हिडिओ बनवला तेव्हा ती अवघ्या 6 वर्षांची होती. काश्मीर मधील सर्वात थंडीचे जे 40 दिवस असतात त्याला ‘चिल्लई कल्लन’ म्हणतात.

“माझ्या वयाच्या मुलांनी त्याचा आनंद घ्यावा आणि त्याला वास्तविक जीवनातील घटनेशी जोडावे अशी माझी इच्छा होती, म्हणून मी चिल्लई कल्लनबद्दल एक व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला.” असं अक्सा म्हणते.

तिने आतापर्यंत सुमारे 50 व्हिडिओ बनवले आहेत आणि तिच्या या प्रवासादरम्यान त्याला प्रेक्षकांचा अफाट पाठिंबा मिळाला. काश्मीरमध्ये पिके कशी घेतली जातात आणि कापणी केली जाते हे दर्शविणारे व्हिडिओ तिने बनवलेत.