
आजकाल मुलेही आश्चर्यकारकपणे प्रतिभावान झाली आहेत. ते अशी प्रतिभा दाखवताना दिसतात, जे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. आता लहान मुले ही गायन-नृत्य इत्यादींमध्ये पारंगत झाली आहेत. त्यामुळेच टीव्हीवर गाणं आणि नृत्याशी संबंधित अनेक कार्यक्रम सुरू आहेत, ज्यात मुलांचं अद्भुत टॅलेंट पाहून लोकांना धक्का बसतो. लहान मुलेही आता विविध प्रकारची वाद्ये वाजवू लागली आहेत. याचं ताजं उदाहरण नुकतंच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाने देसी जुगाडसोबत आपली अफलातून प्रतिभा दाखवली आहे, जी कौतुकास्पद आहे. अर्थात, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे फॅन व्हाल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका मुलाने प्लास्टिकच्या डब्याला ड्रम बनवले आहे आणि तो इतका सुंदर वाजवत आहे की जणू काही तो खरा ढोल वाजवत आहे.
त्याच्या देसी जुगाडच्या ड्रम्समधून निघणारा सुंदर सूर अप्रतिम आहे. अशी गुणी मुले क्वचितच दिसतात.
अशी अनेक मुले आहेत जी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, परंतु ती खूप खूप हुशार आहेत. अशा परिस्थितीत कधी कधी रस्त्यावरही ते आपली प्रतिभा जगाला दाखवू लागतात आणि त्या बदल्यात मिळेल त्या तुटपुंज्या पैशातून ते स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला पोसतात.
व्हिडिओमध्ये दिसणारे मूलही असेच दिसत आहे. तो गरीब असू शकतो, परंतु त्याच्याकडे आश्चर्यकारक कौशल्ये आहेत. तो ड्रम वाजवण्याच्या त्याच्या या कौशल्याने लोकांना आकर्षित करतो. त्याला ऐकण्यासाठी गर्दी होतेय.
मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TansuYegen नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.
He doesn’t deserve to play on streets pic.twitter.com/yxIShj5Ygm
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 19, 2022
अवघ्या ३६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर १५ हजार लोकांनीही या व्हिडिओला लाइक करत विविध कमेंट्स केल्या आहेत