VIDEO | भीक मागणारी महिला फ्ल्यूएंट इंग्रजी बोलते, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पाहा

TRENDING VIDEO | सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ती महिला वयोवृध्द आहे, त्याचबरोबर त्या महिलेचं फ्ल्यूएंट इंग्रजी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पाहा त्या व्हिडीओत ती महिला काय सांगत आहे.

VIDEO | भीक मागणारी महिला फ्ल्यूएंट इंग्रजी बोलते, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पाहा
This woman begging speaks fluent English
| Updated on: Sep 16, 2023 | 8:46 AM

मुंबई : एखाद्या व्यक्तीला अचानक उद्भवलेली परिस्थिती काय करायला लावेल याचा नेम नाही. अनेक चांगली उच्चशिक्षित लोकं सुध्दा रस्त्यावर भीक मागताना दिसलेली आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (English with marlin) झाला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. एक महिला फाडफाड इंग्रजी (This woman begging speaks fluent English) बोलत आहे. तरी सुध्दा ती महिला भीक मागून आपलं आयुष्य जगत आहे. त्या महिलेचं सध्या वय ८१ आहे. एक ब्लॉगरने त्या महिलेची मुलाखत केली आहे. त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यावेळी मुलाखत घेणारा तरुण त्या महिलेला इंग्रजीत प्रश्न विचारत आहे, त्याचवेळी ती महिला सुध्दा इंग्रजीत उत्तर देत आहे.

ज्या मुलाने त्या महिलेची मुलाखत घेतली आहे, त्याचं नाव मोहम्मद आशिक असं आहे. त्या महिलेने तिचं नाव मर्लिन असल्याचं सांगितलं आहे. ज्यावेळी मुलाखातदाराने त्या महिलेला विचारलं की, तुम्ही मुळच्या कुठल्या रहिवासी आहात. त्यावेळी त्या महिलेने म्यांमारच्या रंगून येथील असल्याचं सांगितलं आहे. पूर्वी म्यांमारला बर्माच्या नावानं ओळखलं जात होतं. त्या महिलेने एका भारतीय व्यक्तीशी लग्न केलं आहे. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत चैन्नईला आली. कालांतराने पतीच्या घरातील लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ती महिला घरात एकटीचं राहिली. त्यामुळे ती महिला आपलं पोट भरण्यासाठी भीक मागत आहे. त्याबरोबर त्या महिलेने हे सुध्दा सांगितलं आहे की, पूर्वी त्या महिलेची अवस्था अशी नव्हती. त्यांनी एका शिक्षिकेची नोकरी केली आहे.

ती महिला म्यांमारमध्ये एका शाळेत शिक्षिका होती. त्या तिथल्या शाळेत मुलांना इंग्रजी आणि गणित शिकवत होती. त्या महिलेची ही कहाणी ऐकल्यानंतर अनेकजण भावूक झाले आहेत. मुलाखत घेणारा व्यक्ती सुध्दा या गोष्टीमुळे भावूक झाला आहे. त्या महिलेची गोष्ट ऐकल्यानंतर त्या महिलेच्या आयुष्यात बदल करायला हवा असं तुम्हाला नाही का वाटतं ? असं मुलाखत घेणार व्यक्ती म्हणत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या महिलेला साडी गिफ्ट दिली आहे. त्याचबरोबर लोकांना इंग्रजी शिकवण्याची ऑफर दिली आहे. त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

त्या तरुणाने त्या महिलेच्या (English with Marlin) नावाने सोशल मीडियावरती एक पेज तयार केलं आहे. आता ती महिला लोकांना इंग्रजी शिकवत आहे. त्याचबरोबर त्या महिलेची स्टोरी सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.