या सस्पेंशन पुलाचा व्हिडीओ बघा, मोरबी दुर्घटनेनंतर हा असा व्हिडीओ व्हायरल, जनता संतापली!

हे पर्यटक महाराष्ट्रातून आल्याचे लोकांनी सांगितले. आता ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती पाहून जनता संतापलीये!

या सस्पेंशन पुलाचा व्हिडीओ बघा, मोरबी दुर्घटनेनंतर हा असा व्हिडीओ व्हायरल, जनता संतापली!
suspension bridge
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2022 | 1:35 PM

गुजरातच्या मोरबी केबल ब्रिज दुर्घटनेत 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक क्लिप समोर आली आहे. जिथे काही पर्यटक ‘शिवपुरा हँगिंग ब्रिज’वर मारुतीच्या गाड्या चालवताना दिसलेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पुलावरील स्थानिक लोक गाडीला पुलावरून मागे जायला सांगताना दिसून येतायत. हे पर्यटक महाराष्ट्रातून आल्याचे लोकांनी सांगितले. आता ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती पाहून जनता संतापलीये!

मोरबी पूल दुर्घटनेपासूनही लोक कोणताही धडा घेत नसल्याचं युजर्स लिहित आहेत. कधी सुधारणा होईल माहीत नाही?

रविवारी, 30ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोरबीतील मच्छू नदीवर केबल पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला होता. तर 170 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.

हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला जात आहे. 1 नोव्हेंबर रोजी ट्विटर युझरने @ajaychauhan41 क्लिप शेअर करत लिहिले की, “मोरबी दुर्घटनेनंतरही या इडियट्सनी कोणताही धडा घेतलेला नाही.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा शहरातील सस्पेंशन पुलावर महाराष्ट्रातील पर्यटक गाड्या चालवताना दिसले.

अखेर स्थानिकांच्या मदतीने गाडी सुखरूप परत पाठविण्यात आली. पादचारी आणि दुचाकी वाहनांना बाहेर येण्यासाठी हा अरुंद सस्पेंशन पूल बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ही क्लिप 47 सेकंदांची आहे, ज्यात आपण पाहू शकतो की एका अरुंद सस्पेंशन ब्रिजवरून मारुती 800 कार चालवली जात आहे.

मात्र स्थानिकांनी ते पाहिल्यावर त्यांनी या घटनेचं चित्रीकरण तर केलंच शिवाय चालकाला पुलावरून गाडी परत घेऊन जाण्यास भाग पाडलं.

या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत. तसेच, युझर्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले – त्यांना यमराजला भेटण्याची घाई झाली होती.

त्याचवेळी आणखी एकाने लिहिले- टेस्टिंग सुरू आहे? बहुतेक वापरकर्त्यांनी एकच प्रश्न विचारला, “आपण कधी सुधारणार?”