Video | साडीचा सेल लागलेल्या ठिकाणी महिलांची गर्दी, दोन महिलांमध्ये हाणामारी, केस ओढून एकमेकींना…

VIRAL VIDEO | बेंगलोरमध्ये मैजूर शहरात सिल्क साडीचा सेल एका ठिकाणी लागला आहे. तिथं दोन महिलांची एका साडीवरुन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे.

Video | साडीचा सेल लागलेल्या ठिकाणी महिलांची गर्दी,  दोन महिलांमध्ये हाणामारी, केस ओढून एकमेकींना...
viral news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 25, 2023 | 11:37 AM

बेंगलोर : एखाद्या ठिकाणी सेल लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सगळ्यांच्या आगोदर तिथं अनेकजण पोहोचतात. कारण तिथं सुरुवातीच्या काळात अधिक चांगली कपडे मिळतात असं अनेकांचं म्हणणं असतं. कपड्यांच्या बाबतीत अधिक सूट मिळत असल्यामुळे अनेकजण सेलच्या खरेदीला अधिक पसंती (Mysore Saree Sale Fighting Video) देतात. तिथं गेल्यानंतर एक वस्तू दोन माणसांना अधिक पसंत पडत असल्याचं सुध्दा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे तिथं एकाला समजूदारपणा दाखवावा लागतो. परंतु सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ (VIRAL VIDEO)पाहिल्यानंतर सेल लागलेल्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे का ? असं अनेकांना वाटेल. खासकरुन महिलांना, कारण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ दोन महिलांमधला आहे. दोन महिला एका साडीसाठी भांडत (Fighting Video) आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे दोन महिला एकमेकींना केस ओढून मारहाण करीत आहेत. सेलच्या ठिकाणी दोन महिलांमध्ये वादावादी झाली, तो संपुर्ण हॉल महिलांनी भरलेला आहे. तिथं असेलेल्या सगळ्या महिला या मैसूर सिल्क साडीमध्ये सूट मिळत असल्यामुळे जमा झाल्या आहेत. त्याचवेळी दोन महिलांमध्ये एका साडीवरुन वाद झाला आहे. दोन महिला एकमेकींना ज्यावेळी मारहाण करीत आहेत. त्यावेळी तिथं असलेल्या महिला हा सगळा प्रकार पाहत आहेत. तिथं असलेल्या एका व्यक्तीने महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

साडीच्या सेलमधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही महिला एकमेकींना कमी नाहीत. वादविवाद इतका वाढला की, दोघींनी एकमेकींची केस ओढून मारहाण केली. तिथं असलेल्या महिलांनी आणि पुरुषांनी त्या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी दोन्ही महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आलं, त्यावेळी तिथं पोलिस आले आणि दोन्ही महिलांना वेगळं केल असल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये @Malleshwaram… या व्यक्तीने वर्षातून एकदा सेल लागलाय, एका साडीसाठी दोन महिला भांडण करीत आहेत.