AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : बसमधील सीटसाठी दोन महिलांमध्ये ‘महाभारत’, भांडण पाहून तुम्ही सुध्दा डोके धरणार एवढं मात्र नक्की

Ladies Fight Video : एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बसमधील एका सीटसाठी भांडण झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आलं आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा नक्की डोके धरणार एवढं मात्र नक्की.

VIDEO : बसमधील सीटसाठी दोन महिलांमध्ये 'महाभारत', भांडण पाहून तुम्ही सुध्दा डोके धरणार एवढं मात्र नक्की
Two Women Fight For A Seat In Delhi DTC BusImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 16, 2023 | 7:53 AM
Share

नवी दिल्ली : बसमधून प्रवास (Delhi bus passenger) करीत असताना अनेकदा तुम्हाला भांडणं पाहायला मिळतात. ही भांडणं मुळात तुम्हाला दोन महिलांमध्ये असल्याचं किंवा दोन प्रवाशांमध्ये असल्याचं पाहायला मिळत असेल. तुम्हाला लांबचा प्रवास करायचा आहे. एखाद्या व्यक्तीला लांबचा प्रवास करायचा आहे, त्यावेळी बसमध्ये उभे असलेल्या दोन व्यक्तींमध्ये तिथं बसण्यावरुन वाद (Two Women Fight For A Seat In Delhi DTC Bus) झाला आहे. अशा पद्धतीचे सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाले आहेत. त्याचबरोबर असे व्हिडीओ लोकांना पाहायला सुध्दा अधिक आवडतात. सध्या तशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्या व्हिडीओचा अधिक फायदा घेत आहेत.

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा दिल्लीतील डीटीसी बसमधील आहे. ज्यामध्ये दोन महिलांमध्ये अधिक झगडे झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाब्दीक भांडणाचं रुपांतर मारामारीपर्यंत कोणालाचं समजलं नाही. त्यावेळी आजूबाजूला असलेले प्रवासी त्या महिला प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याचवेळी हे भांडण कमी होण्याऐवजी जास्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, कशा पद्धतीने महिला भांडण करीत आहेत.

बसमध्ये लेडीज सीटवर एक पुरुष बसला आहे, त्याला एका महिला प्रवाशाने तिथून उठण्यास सांगितले, त्यानंतर दुसरी महिला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेचे भांडण वाढले. शेवटी त्या व्यक्तीला उठावे लागते आणि प्रकरण मिटते.

Sumiti Choudhary या नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक जणांना हसू आवरत नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 10 हजार लोकांनी या व्हिडीओला कमेंट केल्या आहेत. तो व्हिडीओ 3 मिनिट 59 सेकंदाचा आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘DTC आज मी दिल्लीच्या DTC बसमध्ये 2 महिलांना भांडताना पाहिले, त्या दोन्ही सीटसाठी लढत होत्या, हा फ्री तिकिटाचा परिणाम आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि काही चूक असेल तर सांगा!’ एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘येथे लोकांना फ्री तिकीट आणि सीटही सुध्दा हवी आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘येथे सर्व दोष त्या पुरुष प्रवाशाचा आहे, जो महिलांच्या सीटवर बसला आहे.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.