Income Tax | 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, ट्विटरवर मोदी सरकारचा उदो उदो

अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याच्या घोषणेनंतर ट्विटरवर लोकांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. ट्विटरवरही जुन्या आणि नव्या करप्रणालीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Income Tax | 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, ट्विटरवर मोदी सरकारचा उदो उदो
memes on income tax
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 01, 2023 | 5:27 PM

7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय 2023 च्या भाषणात ही घोषणा करताच टीव्हीच्या पडद्याला नजर लावून बसलेल्या मध्यमवर्ग आणि नोकरदार माणसाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ज्याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत होती, ती गोष्ट अखेर नरेंद्र मोदी 2.0 सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात जनतेला दिली आहे. लोकांनी आनंदाने उड्या मारल्या आणि ट्विटरवर मोदी सरकारचे कौतुक करायला सुरुवात केली.

अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याच्या घोषणेनंतर ट्विटरवर लोकांच्या कमेंट्सचा पूर आला आहे. ट्विटरवरही जुन्या आणि नव्या करप्रणालीबाबत चर्चा सुरू झाली आहे. या सवलतीचा फारसा फायदा झाला नसल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर अनेकजण जल्लोष करतायत. यासोबतच ते मजेशीर मीम्सच्या माध्यमातून हल-ए-दिल सांगत आहेत. चला तर मग लोकांच्या निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूया…