AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : थकलेलं माकड बाटलीचं झाकण काढतं, एनर्जी ड्रिंकही पितं.. व्हिडिओ पाहिलाय का?

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतात. त्यामध्ये अर्ध्यापेक्षाही जास्त व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल की माकडे लोकांच्या हातातील वस्तू हिसकावून पळून जातात. याच कारणामुळे माकडांना (Monkey) सर्वात खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते.

VIDEO : थकलेलं माकड बाटलीचं झाकण काढतं, एनर्जी ड्रिंकही पितं.. व्हिडिओ पाहिलाय का?
थकल्यानंतर माकडाने काय केले ते पाहा व्हिडीओमध्ये
| Updated on: Feb 22, 2022 | 1:13 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतात. त्यामध्ये अर्ध्यापेक्षाही जास्त व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल की माकडे लोकांच्या हातातील वस्तू हिसकावून पळून जातात. याच कारणामुळे माकडांना (Monkey) सर्वात खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते. माकडे कशी उडी मारतात हे तुम्ही पाहिले असेलच. सध्या अशाच प्रकारचा एक माकडांचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

माकडाचा एनर्जी ड्रिंक पितानाचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वत: च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक माकड एनर्जी ड्रिंक पीत बसलेले आहे. हे पेय पीत असताना तो एका क्षणासाठीही विश्रांती घेत नाही आणि एका दमात एनर्जी ड्रिंक पूर्णपणे पितो. ड्रिंक संपल्यानंतर माकडाने दिलेली अनोखी प्रतिक्रिया बघून सर्वांचेच मन हरखून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होण्यासोबतच हसत देखील आहे.

इथे पाहा माकडाचा व्हायरल झालेला व्हिडीओ

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूजरने सांगितले की, मला वाटते की हे माकड उडी मारून खूप थकले असावे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला त्याच्या जिम पार्टनरची आठवण झाली. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर earthlocus नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : वादळ आलं अन्… सब कुछ उड गया… नाही नाही… फक्त केसच उडाले, पाहा काय फजिती झाली या माणसाची?

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी…! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली